शरीरातली व्हिटॅमिन B 12 ची कमतरता कशी ओळखायची? ५ लक्षणांकडे दुर्लक्ष नकोच- गंभीर आजारांचा धोका
Updated:August 14, 2025 12:34 IST2025-08-14T12:23:57+5:302025-08-14T12:34:50+5:30

व्हिटॅमिन बी १२ हा शरीरातला एक अतिशय महत्त्वाचा घटक. पण बहुतांश शाकाहारी लोकांच्या शरीरात मात्र व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शरीरात व्हिटॅमिन बी १२ कमी आहे, हे त्यांच्या लक्षातही येत नाही.(5 symptoms of vitamin B 12 deficiency)
कारण व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे नेमके काय त्रास होतात, हे त्यांना माहितीच नसतं. म्हणूनच पुढे सांगितलेली काही लक्षणं पाहा. ते त्रास जर तुम्हालाही नेहमीच होत असतील तर लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आहारात योग्य तो बदल करून व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता भरून काढा.(how to identify deficiency of vitamin b 12 in our body?)
व्हिटॅमिन B 12 ची कमतरता सांगणारं सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे हातापायाला मुंग्या येणं. पण बहुतांश लोक या लक्षणाकडे दुर्लक्ष करतात आणि तिथेच चुकतात. असा त्रास नेहमीच व्हायला लागला असेल तर डाॅक्टरांचा सल्ला लवकर घ्या. जेणेकरून शक्य तेवढ्या लवकर शरीरातली व्हिटॅमिन बी १२ ची कमी भरून काढता येईल. कारण हळूहळू हा त्रास वाढत गेला तर त्याचा परिणाम नर्व्हस सिस्टिमवर होतो.
नेहमीच थकवा येणे, सतत झोपून राहावंसं वाटणे. व्हिटॅमिन बी १२ शरीरामध्ये आरबीसी म्हणजेच लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी मदत करत असतं. या पेशी शरीरातील सर्व भागांत ऑक्सिजन पोहोचविण्याचं काम करतात. जर लाल रक्तपेशी कमी झाल्या तर ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि मग ऑक्सिजनअभावी थकवा येणे, झोप येणे असा त्रास होतो.
त्वचा मलूल, निस्तेज होणे. शरीरातील ऑक्सिजन कमी झालं तर आपोआपच त्याचा परिणाम आपल्या त्वचेवरही होतो आणि त्वचा पिवळट पडल्यासारखी किंवा निस्तेज, डल दिसू लागते.
व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे मेंदूवरही परिणाम होतं. डोकं सुन्न झाल्यासारखं होतं. कोणताही निर्णय घेताना खूप गाेंधळून गेल्यासारखं होतं. डिप्रेशन येतं. मूड स्विंगचा त्रासही होतोच.
जीभ कोरडी पडणे, तोंडात आणि जिभेवर जखमा होणे, फोडं येणे असा त्रास वारंवार होत असेल तर ते ही शरीरात व्हिटॅमिन बी १२ कमी आहे, हे सांगणारं एक लक्षण आहे.