१ पैसाही खर्च न करता घरच्याघरी करा आरोग्य तपासणी- ५ मिनिटांत कळेल तुमची तब्येत कशी आहे?
Updated:August 11, 2025 13:42 IST2025-08-11T12:04:51+5:302025-08-11T13:42:14+5:30

हेल्थ चेकअप करायचं म्हटलं की दवाखान्यात किंवा लॅबमध्ये जाऊन ब्लड सॅम्पल, युरिन सॅम्पल द्यावं लागतं आणि मग त्यातून आपल्या तब्येतीचा अंदाज येतो. शरीरात कोणत्या घटकाची कमतरता आहे, हे लक्षात येतं..( 5 Simple tests for health check up at home)
पण यातल्या कित्येक गोष्टी तुम्हाला अगदी घरबसल्याही कळू शकतात. त्यासाठी कुठेही जाऊन रक्त तपासणी करण्याची गरज नाही. त्या नेमकं काय करायचं आणि घरच्याघरी स्वत:चं हेल्थ चेकअप कसं करायचं याविषयीची माहिती डॉक्टरांनी myexpertdoctor या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.(how to take fitness test at home?)
यामध्ये डाॅक्टरांनी सांगितलेली पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या त्वचेला एक बारीक चिमटा घ्या. त्यानंतर त्वचा पुन्हा पहिल्यासारखी होण्यासाठी २ सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागत असेल तर तुमच्या शरीरात पाणी खूप कमी आहे. त्यासाठी पाणी पिण्याचे प्रमाण वाढवा.
दुसरी चाचणी करण्यासाठी जमिनीवर बसा. आता कुठेही न धरता उठून उभे राहा. जर तुम्ही तसं करू शकलात तर तुमचे पायाचे स्नायू, हाडं स्ट्राँग आहेत.
एका जागी शांतपणे बसा. त्यानंतर दिर्घ श्वास घ्या. श्वास घेतल्यानंतर तुम्ही जर तो ३० सेकंदांपर्यंत राेखून धरू शकलात तर याचा अर्थ असा की तुमचे फुफ्फुस उत्तम आहे.
एका दमात जर सरसर ३ जीने चढून जाऊ शकलात आणि त्यानंतरही तुम्हाला खूप जास्त धाप लागणे, श्वास घेता न येणे असा त्रास झाला नाही तर तुमच्या हृदयाचे आरोग्यही उत्तम आहे.
सकाळी उठल्यानंतर लिंबू आणि मीठ एकत्र करून खा. जर तुम्हाला त्याची चव खूप वेगळी लागली नाही, तर तुमचं आरोग्य चांगलं आहे.