तरुणींमध्ये PCOS चा त्रास वाढण्याची ५ मुख्यं कारणं- वेळीच 'हे' बदल करा, त्रास कमी होईल

Updated:September 5, 2025 17:01 IST2025-09-05T16:55:38+5:302025-09-05T17:01:55+5:30

तरुणींमध्ये PCOS चा त्रास वाढण्याची ५ मुख्यं कारणं- वेळीच 'हे' बदल करा, त्रास कमी होईल

पीसीओएस (PCOS) आणि पीसीओडी (PCOD) हे त्रास सध्या तरुण मुलींमध्ये खूप वाढत असल्याचे दिसून येत आहे. काही वर्षांपुर्वी क्वचित एखादीला हा त्रास असायचा. पण आता मात्र बहुतांश मुलींना ही समस्या आहेच..

तरुणींमध्ये PCOS चा त्रास वाढण्याची ५ मुख्यं कारणं- वेळीच 'हे' बदल करा, त्रास कमी होईल

यामागची काही मुख्य कारणं डॉक्टरांनी सांगितली असून ती नेमकी कोणती हे जाणून घेतलं तर हा त्रास वेळीच कमी करता येणं शक्य आहे.(5 main reasons for Rising PCOS in teens and young women)

तरुणींमध्ये PCOS चा त्रास वाढण्याची ५ मुख्यं कारणं- वेळीच 'हे' बदल करा, त्रास कमी होईल

डॉ. कविता पुजर यांनी एचटी लाईफस्टाईलला दिलेल्या मुलाखतीनुसार पीसीओएसचा त्रास वाढण्यामागचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे शारिरीक हालचालींचा व्यायाम. हल्लीच्या तरुण मुली अभ्यास, काम यानिमित्ताने तासनतास एका जागी बसून असतात. गरजेपुरताही व्यायाम त्यांच्या शारिरीक हालचालींमधून होत नाही.

तरुणींमध्ये PCOS चा त्रास वाढण्याची ५ मुख्यं कारणं- वेळीच 'हे' बदल करा, त्रास कमी होईल

आहारपद्धतीमध्ये खूप बदल झाला आहे. समतोल, पौष्टिक आहार न घेतल्यामुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडते. त्याचा परिणाम मासिक पाळीवरही होतोच.

तरुणींमध्ये PCOS चा त्रास वाढण्याची ५ मुख्यं कारणं- वेळीच 'हे' बदल करा, त्रास कमी होईल

कॉस्मेटिक्सचा वाढलेला वापर, प्लास्टिकचा वाढलेला वापर यामुळेही हार्मोन्सचे संतुलन बिघडते. आणि त्याचा परिणाम endocrine system चे कार्य बिघडण्याच्या स्वरुपात दिसून येतो.

तरुणींमध्ये PCOS चा त्रास वाढण्याची ५ मुख्यं कारणं- वेळीच 'हे' बदल करा, त्रास कमी होईल

हल्ली अभ्यास, परिक्षा, करिअर यांचा ताण खूप वाढला आहे. त्यामुळे झोपेचे चक्रही विस्कळीत होते. कायम अपुरी झोप घेतल्यानेही हार्मोन्सचे संतुलन बिघडते आणि पीसीओएसचा त्रास वाढतो.

तरुणींमध्ये PCOS चा त्रास वाढण्याची ५ मुख्यं कारणं- वेळीच 'हे' बदल करा, त्रास कमी होईल

पीसीओएसचा त्रास काही प्रमाणात अनुवंशिकही आहे. तुमच्या घरात जर आई, बहिण यांना असा त्रास असेल तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार घ्या.