हिमोग्लोबिन ९ पेक्षाही कमी, तब्येतीला धोका? खा ‘हे’ ५ सुपरफूड, हिमोग्लोबिन वाढेल भरभर...
Updated:September 18, 2025 19:00 IST2025-09-18T18:41:41+5:302025-09-18T19:00:02+5:30
5 foods to increase hemoglobin level : best foods for hemoglobin : how to increase hemoglobin naturally : foods to boost hemoglobin fast : natural ways to increase hemoglobin : top foods to improve hemoglobin : हिमोग्लोबिन कमी झालंय,रोज खा ७ पदार्थ - रक्त वाढेल अशक्तपणा येणारच नाही...

सध्याच्या काळात अनेकांना हिमोग्लोबिन कमी होण्याची (natural ways to increase hemoglobin) समस्या सतावते. हिमोग्लोबिन (Hemoglobin) कमी झाल्यामुळे शरीरात अशक्तपणा, थकवा, डोकेदुखी आणि श्वास घेण्यास त्रास होण्यासारखी लक्षणे दिसतात. जर तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिन लेव्हल ९ पेक्षा कमी असेल, तर ते आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असते.
अशा परिस्थितीत, शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी योग्य आणि पौष्टिक (5 foods to increase hemoglobin level) आहार घेणे खूप महत्त्वाचे असते. आपण काही अशा पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत, जे तुमच्या आहारात समाविष्ट केल्यास हिमोग्लोबिनची पातळी नैसर्गिकरित्या वाढण्यास मदत करतील.
१. हिरव्या पालेभाज्या :-
पालक, ब्रोकोली यांसारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये आयर्न फोलेट आणि व्हिटॅमिन 'सी' (Vitamin C) भरपूर प्रमाणात असते. आयर्न लाल रक्तपेशी (Red Blood Cells) तयार करण्यास मदत करते, तर फोलेट नवीन पेशींच्या निर्मितीमध्ये फायदेशीर ठरते. व्हिटॅमिन सी शरीरातील लोहाचे शोषण (absorption) सुधारते. यासाठीच, आहारात संत्री, लिंबू, स्ट्रॉबेरी, टोमॅटो, ढोबळी मिरची आणि ब्रोकोली यांचा समावेश केल्यास शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.
२. डाळी आणि कडधान्ये :-
मसूर, छोले आणि राजमा यांसारख्या डाळी व कडधान्ये आयर्न, प्रोटीन आणि फोलेटचा उत्तम स्रोत आहेत. डाळी व कडधान्यात प्रोटीन जास्त प्रमाणात असते तसेच लो फॅट्स असल्याने आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. आहारात डाळी व कडधान्यांचा समावेश केल्याने पचनक्रिया सुधारते आणि शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात.
३. ड्रायफ्रुटस आणि सीड्स :-
बदाम, अक्रोड सारखे ड्रायफ्रुटस व अळशीच्या आणि भोपळ्याच्या बिया यात भरपूर प्रमाणांत पोषक तत्व असतात. यात आयर्न व्हिटॅमिन ई (Vitamin E) आणि मिनरल्स देखील असतात. दररोज सकाळी नाश्त्यात किंवा स्नॅक्स म्हणून ड्रायफ्रुट्स आणि सीड्स खाल्ल्यास हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.
४. तृणधान्ये आणि होल ग्रेन :-
आयर्न आणि इतर पोषक तत्वांनी समृद्ध असलेली तृणधान्ये (Cereals) आणि ओट्स, ब्राऊन राइस, आणि क्विनोआ यांसारखे होल ग्रेन (whole grains) देखील हिमोग्लोबिन वाढवण्यास फायदेशीर असतात. हे पदार्थ सहजपणे आपल्या आहारात समाविष्ट केले जाऊ शकतात.
५. फळे :-
डाळिंब, सफरचंद, संत्री, लिंबू, द्राक्ष आणि बेरीज (berries) यांसारख्या फळांमध्ये आयर्न आणि व्हिटॅमिन 'सी' भरपूर प्रमाणांत असते. प्रामुख्याने ही फळे शरीरात लोहाचे शोषण (absorption) करण्यास मदत करतात आणि रक्ताचे आरोग्य (Blood Health) चांगले राखतात. दररोज ताजी फळे खाणे हिमोग्लोबिनची पातळी योग्य राखण्यासाठी खूपच फायदेशीर ठरते.
६. हेल्थलाईनच्या एका रिपोर्टनुसार, हिमोग्लोबिन नैसर्गिकरित्या वाढवणे तसे फारसे कठीण नाही, फक्त योग्य आहार आणि पोषक तत्वांकडे लक्ष देणे गरजेचे असते. हिरव्या पालेभाज्या, डाळी व कडधान्ये, ड्रायफ्रुटस व सीड्स, तृणधान्ये आणि फळे यासाठी खूप फायदेशीर ठरतात. या पदार्थांचा रोजच्या आहारात समावेश करून आपण शरीरातील हिमोग्लोबिन आणि रोगप्रतिकारशक्ती दोन्ही सुधारू शकता.