खूप गळून गेल्यासारखं वाटतं ५ पदार्थ खा- थकवा जाईल पळून, अंगात तरतरी येऊन वाटेल फ्रेश

Updated:February 28, 2026 09:40 IST2026-02-28T09:37:08+5:302026-02-28T09:40:02+5:30

खूप गळून गेल्यासारखं वाटतं ५ पदार्थ खा- थकवा जाईल पळून, अंगात तरतरी येऊन वाटेल फ्रेश

कधी कधी खूप थकवा आल्यासारखं होतं. गळून गेल्यासारखं वाटतं. अशावेळी काही पदार्थ आपण खाल्ले तर अंगातला थकवा बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो. ते पदार्थ नेमके कोणते ते पाहूया..(5 foods that gives instant energy)

खूप गळून गेल्यासारखं वाटतं ५ पदार्थ खा- थकवा जाईल पळून, अंगात तरतरी येऊन वाटेल फ्रेश

यापैकी पहिला पदार्थ आहे खजूर. खजुरामध्ये लोह आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. शिवाय नॅचरल शुगरही त्यात चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे खजूर खाताच लगेचच एनर्जी आल्यासारखं वाटतं.(foods that helps to reduce weakness)

खूप गळून गेल्यासारखं वाटतं ५ पदार्थ खा- थकवा जाईल पळून, अंगात तरतरी येऊन वाटेल फ्रेश

बेदाणे किंवा किशमिशही तुम्ही काही दिवस नियमितपणे खाऊन पाहा. ७ ते ८ बेदाणे रात्री झोपण्यापुर्वी पाण्यात भिजवा आणि सकाळी ते खा. यामुळे अंगातलं रक्त वाढतं. लगेचच थकवा पळून जाण्यास मदत होते.