Join us   

बॅड कोलेस्टेरॉल कमी करणारे ५ पदार्थ, डॉक्टर सांगतात रोज १ तरी खा- हृदय राहील ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2024 3:00 PM

1 / 8
हल्ली जंकफूड खाण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यातच अनेक लोक नियमितपणे व्यायामही करत नाहीत. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे सध्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढण्याचा त्रास अनेकांना होत आहे.
2 / 8
आपण जर आहार योग्य पद्धतीने घेतला आणि काही पदार्थ आहारात नियमितपणे घेतले तर शरीरातील LDL म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉलचे (bad cholesterol) प्रमाण नियंत्रित राहू शकते. ते पदार्थ नेमके कोणते याविषयीची माहिती आहारतज्ज्ञ रुपाली दत्ता यांनी एनडीटीव्ही यांना दिली आहे.
3 / 8
तसेच एनडीटीव्ही यांनी दिलेल्या वृत्तानुसार University of Manitoba in Winnipeg, Manitoba यांनी केलेल्या अभ्यासानुसार कोलेस्ट्रॉलचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना महिनाभर काही ठराविक पदार्थ नियमितपणे खायला दिले. त्यानंतर त्यांच्या शरीरातली कोलेस्ट्रॉलची पातळी बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात आल्याचे दिसून आले. ते पदार्थ नेमके कोणते ते पाहा..
4 / 8
त्यातला पहिला पदार्थ आहे आवळा. Indian Journal of Pharmacology यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार आवळा कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो.
5 / 8
दुसरा पदार्थ आहे ग्रीन टी. ग्रीन टी मध्ये असणारे पॉलीफिनॉल्स कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवतात.
6 / 8
कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी लिंबू, तसेच लिंबूवर्गीय फळेही नियमितपणे खायला पाहिजेत.
7 / 8
पालकामध्ये असणारे कॅरेटोनॉईड्स बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते.
8 / 8
University of California यांच्या अभ्यासानुसार वजन आणि वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अक्रोड खूप उपयोगी ठरतात.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सअन्न