1 / 8शरीरातलं कॅल्शियम वाढवून हाडं बळकट ठेवायची असतील तर दूध प्यायलाच हवं असं आपण ऐकलेलं असतं. काही जणांना दुधाची चव अजिबात आवडत नाही. पण तरीही फक्त त्यातून कॅल्शियम मिळतं म्हणून ती दूध पितात.(5 food that gives more calcium than milk)2 / 8आपल्या मुलांनी दूध प्यायलं नाही तर त्यांना कॅल्शियम मिळणार कसं ही चिंताही अनेक आईंना असते. म्हणून त्या बळजबरीने मुलांना दूध देतात.(calcium rich food)3 / 8पण फक्त कॅल्शियम मिळविण्यासाठीच दूध पिण्याचा आग्रह तुम्ही करत असाल तर तो थांबवा (superfood for calcium). कारण असे इतर काही पदार्थही आहेत ज्यांच्यामधून दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम मिळतं.(best food for bones)4 / 8त्यापैकी पहिला पदार्थ म्हणजे तीळ. तीळामधून चांगल्या प्रमाणात कॅल्शियम, व्हिटॅमिन ई मिळतं. केस आणि त्वचा उत्तम ठेवण्यासाठीही तीळ उपयुक्त ठरतात.5 / 8शेवग्याच्या शेंगांप्रमाणेच शेवग्याच्या पानांमधूनही कॅल्शियम मिळते. त्यासोबतच त्यातून प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन सी देखील मिळते.6 / 8भरपूर कॅल्शियम देणारा तिसरा पदार्थ आहे नाचणी. हाडांना बळकटी देण्यासाठी नाचणी खूप फायदेशीर ठरते. त्यामुळे नाचणीचे वेगवेगळे पदार्थ अधूनमधून अवश्य खायला हवे.7 / 8राजगिऱ्यामधून कॅल्शियम आणि प्रोटीन्स हे दोन्हीही चांगल्या प्रमाणात मिळतात. त्यामुळे फक्त उपवासाच्या दिवशीच राजगिरा न खाता तो एरवीही नेहमीच खायला हवा.8 / 8सुके अंजीर रात्री झोपण्यापुर्वी पाण्यात भिजत घाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते उपाशीपोटी खा. यामुळे संधीवाताचा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होतो.