लवकरच हार्ट ॲटॅक येणार..! हे सांगणारी ५ लक्षणं- दुर्लक्ष नकोच, लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या

Updated:June 2, 2025 21:40 IST2025-06-02T21:32:23+5:302025-06-02T21:40:48+5:30

लवकरच हार्ट ॲटॅक येणार..! हे सांगणारी ५ लक्षणं- दुर्लक्ष नकोच, लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या

बदललेल्या लाईफस्टाईलमुळे तरुण वयातच हार्ट ॲटॅक येण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे. त्यामुळे आपल्या आरोग्याविषयी प्रत्येकानेच जागरुक होणे आता गरजेचे झाले आहे.(5 early symptoms of heart attack)

लवकरच हार्ट ॲटॅक येणार..! हे सांगणारी ५ लक्षणं- दुर्लक्ष नकोच, लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या

हार्ट ॲटॅक काही अचानक येत नाही. तो येण्यापुर्वी आपलं शरीर आपल्याला काही सूचना करत असतं (major symptoms of heart attack). पण आपण मात्र आपल्या अज्ञानामुळे त्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणूनच हार्ट ॲटॅक येण्यापुर्वी शरीरात होणारे काही बदल प्रत्येकाला वेळीच ओळखू यायला हवेत. जेणेकरून त्याकडे दुर्लक्ष न होता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेता येईल.(how to identify heart attack symptoms?)

लवकरच हार्ट ॲटॅक येणार..! हे सांगणारी ५ लक्षणं- दुर्लक्ष नकोच, लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या

हार्टॲटॅकची लक्षणं कोणती याविषयीची आहारतज्ज्ञ रमिता कौर यांनी दिलेली माहिती नवभारत टाईम्सने प्रकाशित केली आहे. यामध्ये सांगण्यात आलेलं पहिलं लक्षण म्हणजे थोडं काम झालं तरी लगेचच दम लागणे. श्वास घेण्यात त्रास होणे. छातीत काहीतरी अडकल्यासारखं वाटणे.

लवकरच हार्ट ॲटॅक येणार..! हे सांगणारी ५ लक्षणं- दुर्लक्ष नकोच, लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या

थंड किंवा नॉर्मल वातावरणातही अचानक खूप घाम येणं. आपल्यासोबत बसलेल्या इतर व्यक्तींना घाम येत नसेल आणि फक्त आपल्यालाच खूप घाम घाम येत असेल तर हे काही बरं लक्षण नाही. याबाबतीत डॉक्टरांचा सल्ला घ्यायलाच हवा.

लवकरच हार्ट ॲटॅक येणार..! हे सांगणारी ५ लक्षणं- दुर्लक्ष नकोच, लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या

पाठ, जबडा, मान खूप आखडून जाणे.

लवकरच हार्ट ॲटॅक येणार..! हे सांगणारी ५ लक्षणं- दुर्लक्ष नकोच, लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या

हार्ट ॲटॅक येण्याच्या काही दिवस आधी अनेकांची पचनक्रियाही थोडी बिघडते. अनेकांना पोट फुगण्याचा, पोट गुबारण्याचा त्रास होतो.

लवकरच हार्ट ॲटॅक येणार..! हे सांगणारी ५ लक्षणं- दुर्लक्ष नकोच, लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या

आधी कधी खोकला येत नसेल आणि आता अचानकच खोकला येत असेल आणि एकदा खोकला आला की पुढे १० ते १५ मिनिटे तो तसाच चालू राहात असेल तर डॉक्टरांचा सल्ला एकदा घ्यायला हवा.