स्तन जड वाटतात, अंगावर पांढरं पाणी जातं? महिलांना कॅन्सरचे संकेत देतात हे ५ बदल

Published:April 1, 2023 02:50 PM2023-04-01T14:50:56+5:302023-04-01T16:51:14+5:30

5 Cancer symptoms women shouldn't ignore : ओटीपोटात सतत वेदना, मध्येच त्रास सुरू होतो. रक्तस्त्राव होतो. ही वेदना गर्भाशयाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.

स्तन जड वाटतात, अंगावर पांढरं पाणी जातं? महिलांना कॅन्सरचे संकेत देतात हे ५ बदल

पुरूषांच्या तुलनेत महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. कोणताही आजार झाला की लक्षणे दिसतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. आपल्याला फक्त ती लक्षणे ओळखण्याची गरज आहे. महिलांना कर्करोगासारखे आजार होण्याचीही शक्यता असते. या काळात महिलांमध्ये अनेक बदल होऊ शकतात. (What Are the Symptoms of Gynecologic Cancers)

स्तन जड वाटतात, अंगावर पांढरं पाणी जातं? महिलांना कॅन्सरचे संकेत देतात हे ५ बदल

ते बदल ओळखून सावध राहणे आवश्यक आहे. बऱ्याचदा महिला रोजच्या कामांच्या व्यापात स्वत:कडे लक्ष देत नाहीत. त्रास अंगावर काढतात. त्यामुळे त्रास वाढतच जातो. कॅन्सरसारखा गंभीर आजार टाळायचा असेल तर महिलांना वेळीच आपल्या तब्येतीकडे लक्ष द्यायला हवं.

स्तन जड वाटतात, अंगावर पांढरं पाणी जातं? महिलांना कॅन्सरचे संकेत देतात हे ५ बदल

स्तनाचा कर्करोग स्त्री किंवा पुरुष कोणालाही होऊ शकतो. पण स्त्रियांमध्ये याची शक्यता जास्त असते. स्तनामध्ये काही प्रकारचे बदल होत आहेत. रंग बदल होत असेल तर सतर्क राहण्याची गरज आहे. जर तुम्हाला स्तन किंवा बाजूला गाठ दिसली तर ताबडतोब डॉक्टरांना भेटा.

स्तन जड वाटतात, अंगावर पांढरं पाणी जातं? महिलांना कॅन्सरचे संकेत देतात हे ५ बदल

cएंडोमेट्रियल कॅन्सरच्या 90 टक्क्यांहून अधिक प्रकरणे जास्त रक्तस्रावामुळे उद्भवतात. रजोनिवृत्ती झाली असेल आणि कोणत्याही प्रकारचा रक्तस्त्राव होत असेल तर ताबडतोब तपासावे.

स्तन जड वाटतात, अंगावर पांढरं पाणी जातं? महिलांना कॅन्सरचे संकेत देतात हे ५ बदल

जास्त द्रव न घेणं हा डायबिटीस सारखा आजार नाही. तरीही पुन्हा-पुन्हा शौचालयात जावं लागत असेल तर ते संकेत असू शकते. याचा अर्थ मूत्राशयावर सतत दबाव असतो.

स्तन जड वाटतात, अंगावर पांढरं पाणी जातं? महिलांना कॅन्सरचे संकेत देतात हे ५ बदल

ओटीपोटात सतत वेदना, मध्येच त्रास सुरू होतो. रक्तस्त्राव होतो. या वेदना गर्भाशयाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.

स्तन जड वाटतात, अंगावर पांढरं पाणी जातं? महिलांना कॅन्सरचे संकेत देतात हे ५ बदल

हालचाल न करता वजन कमी होत आहे. भूक न लागणे, मळमळणे, सतत थकल्यासारखे वाटणे ही लक्षणे देखील कर्करोगाची असू शकतात. पोटात काही प्रकारचा गंभीर त्रास होऊ शकतो.