दूध आवडत नाही? भरपूर कॅल्शियम देणारे ५ पदार्थ खा, मुलांनाही द्या-हाडं बळकट होतील

Updated:January 14, 2025 15:37 IST2025-01-14T13:30:52+5:302025-01-14T15:37:03+5:30

दूध आवडत नाही? भरपूर कॅल्शियम देणारे ५ पदार्थ खा, मुलांनाही द्या-हाडं बळकट होतील

अनेकजणांना दूध प्यायला आवडत नाही. लहान मुलंही दूध प्यायला खूप टाळाटाळ करतात. जर मुलांनी दूध प्यायलं नाही तर त्यांना कॅल्शियम कसं मिळणार (5 calcium rich veg food), त्यांची हाडं बळकट कशी होणार असं तुम्हाला वाटत असेल तर हे काही पदार्थ मुलांना रोजच्या रोज खाऊ घाला.(superfood for calcium)

दूध आवडत नाही? भरपूर कॅल्शियम देणारे ५ पदार्थ खा, मुलांनाही द्या-हाडं बळकट होतील

बऱ्याच महिलांना कमी वयातच पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी सुरू होते. त्यामुळे महिलांनीही हाडांच्या बळकटीसाठी काही पदार्थ नियमितपणे खायलाच पाहिजेत (how to improve calcium level). ते पदार्थ नेमके कोणते याची माहिती डॉक्टरांनी dr.monika_jinde_bagade या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.(how to get rid of calcium deficiency?)

दूध आवडत नाही? भरपूर कॅल्शियम देणारे ५ पदार्थ खा, मुलांनाही द्या-हाडं बळकट होतील

त्यापैकी पहिला पदार्थ आहे तीळ. तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. रोज अर्धा टेबलस्पून तीळ खाल्ले तरी ते पुरेसे होते. तीळ खाण्यापुर्वी ते थोडेसे भाजून घ्यावेत.

दूध आवडत नाही? भरपूर कॅल्शियम देणारे ५ पदार्थ खा, मुलांनाही द्या-हाडं बळकट होतील

भरपूर कॅल्शियम देणारा दुसरा पदार्थ आहे शेवगा. शेवग्याचं सूप, शेवग्याची भाजी, शेवग्याच्या शेंगांची आमटी अशा वेगवेगळ्या पदार्थांच्या माध्यमातून शेवगा खायला हवा.

दूध आवडत नाही? भरपूर कॅल्शियम देणारे ५ पदार्थ खा, मुलांनाही द्या-हाडं बळकट होतील

रताळ्यांमधूनही भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळते. पण रताळे आपण फक्त उपवासापुरतेच मर्यादित ठेवतो. रताळ्याचे पदार्थ आपल्या आहारात नियमितपणे असतील तर शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून निघण्यास मदत होते.

दूध आवडत नाही? भरपूर कॅल्शियम देणारे ५ पदार्थ खा, मुलांनाही द्या-हाडं बळकट होतील

नाचणीमध्येही कॅल्शियम खूप चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे नाचणी सत्त्व, नाचणीचं पीठ यांच्यापासून केलेले विविध पदार्थ तुमच्या आहारात असायला हवे. लहान मुलांनाही ते आवर्जून खाऊ घाला.

दूध आवडत नाही? भरपूर कॅल्शियम देणारे ५ पदार्थ खा, मुलांनाही द्या-हाडं बळकट होतील

भेंडीची भाजी अनेक मुलं आवडीने खातात. पण मोठी माणसं मात्र भेंडी खायला टाळाटाळ करतात. भेंडीमधून चांगल्या प्रमाणात कॅल्शियम मिळते. त्यामुळे मुलांना भेंडी आवडत असेल तर भरपूर खाऊ घाला आणि तुम्हीही खा.