जेवल्यानंतर फक्त ५ मिनिटे चाला- वजन कमी होण्यासाेबतच मिळतील ५ जबरदस्त फायदे
Updated:February 27, 2025 14:07 IST2025-02-27T14:00:22+5:302025-02-27T14:07:16+5:30

जेवण झाल्यानंतर शतपावली करायला पाहिजे हे आपल्याला माहिती आहे. पण तरी कधी कंटाळा येतो म्हणून तर कधी वेळ नसतो म्हणून आपण ती करणं टाळतो. तुम्हीही असंच करत असाल तर जेवण केल्यानंतर चालण्याचे हे फायदे वाचा, आपोआप स्वत:साठी ५ मिनिटांचा वेळ काढाल...(5 benefits of 5 minutes walk after meal)
स्पोर्ट्स मेडिसिन यांनी नुकताच एक अभ्यास प्रकाशित केला आहे. यामध्ये त्यांनी जेवण झाल्यानंतर तुम्ही केवळ २ ते ५ मिनिटे जरी चाललात तरी तुमच्या तब्येतीवर त्याचा कसा परिणाम होऊ शकतो, याविषयीची माहिती सांगितली आहे.(5 benefits of walking after meals for 5 minutes)
जेवल्यानंतर चालल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण एकदम वाढत नाही. ते नियंत्रित राहण्यास मदत होते.
PLOS यांच्या अभ्यासानुसार जेवण केल्यानंतर काही मिनिटे चालल्याने आतड्याचे काम अधिक चांगले होऊन पचनक्रिया उत्तम होते. यामुळे आपोआपच शरीरावर चरबी साचून राहण्याचे प्रमाण घटते.
चालल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण चांगले होते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहून हृदय निरोगी राहण्यासही मदत होते.
जेवण झाल्यानंतर चालल्यामुळे शरीरातील कॉर्टिसॉल हा स्ट्रेस हार्मोन कमी होण्यास मदत होते तसेच एंडोमॉर्फिन आणि ऑक्सिटोसिन हे पॉझिटीव्ह हार्मोन्स वाढतात. त्यामुळे ताण कमी होतो. रिलॅक्स वाटते.
ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे त्यांनीही जेवण झाल्यानंतर काही मिनिटांसाठी नियमितपणे चालावे. कारण चालल्यामुळे शरीरातील स्ट्रेस हार्मोन्सचे प्रमाण कमी होत असल्याने मन, शरीर रिलॅक्स होऊन चांगली झोप लागते.