बीपी-शुगर म्हणून अश्वगंधा घेताय, ‘या‘ पद्धतीने घ्या! मिळतील असरदार ५ फायदे अगदी कमी दिवसात
Updated:September 9, 2025 14:08 IST2025-09-05T09:20:50+5:302025-09-09T14:08:00+5:30

अश्वगंधा ही औषधी आपल्याकडे अतिशय महत्त्वाची मानली जाते. काढा किंवा चहा या स्वरुपात ती घेतली तर तिचे शरीराला खूप लाभ होतात. ते लाभ नेमके कोणते ते पाहूया..
अश्वगंधाचा काढा दररोज रात्री झोपण्यापुर्वी घेतल्यास स्ट्रेस, एन्झायटी कमी होऊन शांत झोप लागते असं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ या अभ्यासात सांगितलं आहे.
मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी तसेच एकाग्रता वाढण्यासाठीही अश्वगंधाचा काढा पिणे उपयुक्त ठरते.
National Centre for Complementary and Integrative Health यांच्या अभ्यासानुसार ज्यांना रात्री शांत झोप येत नाही त्यांनी रात्री झोपण्यापुर्वी अश्वगंधाचा काढा प्यावा. लवकर शांत झोप येईल.
अश्वगंधामध्ये भरपूर प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठीही अश्वगंधा उपयोगी ठरते.
रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठीही अश्वगंधा उपयुक्त ठरते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनीही डॉक्टरांच्या सल्ल्याने अश्वगंधाचा काढा घेण्यास हरकत नाही.