चहाप्रेमी आहात ना? मग चहाचे ४ नियम तुम्हाला माहिती हवेतच! आरोग्य जपत चहा प्यायचा तर....
Updated:October 6, 2025 13:54 IST2025-10-06T13:48:18+5:302025-10-06T13:54:21+5:30

चहा हे बहुसंख्य भारतीय लोकांचे अतिशय आवडीचे पेय. सकाळी उठताच गरमागरम चहाच कप हातात आला की मग झोप पळून जाते आणि दिवस कसा मस्त सुरू होतो..
खूप चहा प्यायला नाही तरी सकाळचा चहा आणि दुपारचा चहा हा तर चहाप्रेमींना हवाच असतो. आवडत असेल तर तुम्ही चहा जरुर प्या. पण त्याचे काही नियम पाळा. जेणेकरून चहाचा तुम्हाला कधीच त्रास होणार नाही. ते नियम नेमके कोणते याविषयीची माहिती डॉक्टरांनी dr.nehakarandikarjoshi या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
यामध्ये डॉक्टर सांगत आहेत की आयुर्वेदानुसार चहा हा कषायरसात्मक आणि तुरट आहे. तो थोडा रुक्षही आहे. चहा हा नेहमी सकाळी ६ ते ८ आणि संध्याकाळी ६ ते ८ यावेळेत प्यावा. त्यामुळे तो शरीरासाठी त्रासदायक ठरत नाही.
चहामध्ये थोडीशी सुंठ पावडर नक्की घाला. यामुळे पित्ताचा त्रास होणार नाही.
तिसरा महत्त्वाचा नियम म्हणजे दूध आणि चहाचे पाणी कधीही एकत्र करून उकळू नका. त्यातून कॅन्सर निर्माण करणारे गुणधर्म त्यात तयार होतात. त्यामुळे दूध आणि चहाचं पाणी नेहमी वेगवेगळं उकळून मग एकत्र करा.
नाश्ता झाल्यानंतर अनेकांना चहा पिण्याची सवय असते. असं करू नका. चहा आणि नाश्ता यांच्यामध्ये गॅप ठेवा. कारण काही खाल्ल्यानंतर लगेचच चहा प्यायला तर अन्नातून जे पौष्टिक घटक तुमच्या शरीरात जातात ते चहामुळे रक्तात नीट मिसळले जात नाहीत आणि त्याचा शरीराला लाभ होत नाही.