खाण्यापिण्याच्या ४ चुकीच्या सवयी वाढवतात हार्ट अॅटॅकचा धोका! वेळीच बदला वाईट सवयी - नाहीतर होईल पश्चाताप....
Updated:September 30, 2025 09:45 IST2025-09-30T09:45:00+5:302025-09-30T09:45:06+5:30
4 Common Eating Habits Which Increase the Risk of Heart Attack : common eating habits that cause heart attack : worst eating habits for heart health : unhealthy eating habits and heart attack risk : रोजच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये करताय काही चुका येऊ शकतो हार्ट अॅटॅक, अशी घ्या खबरदारी...

आजच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये, हृदयाचे आजार फक्त वृद्धांमध्येच नव्हे, तर तरुणांमध्येही मृत्यूचे एक प्रमुख कारण बनले आहे. आपलं हृदय निरोगी (unhealthy eating habits and heart attack risk) राहावं यासाठी नियमित व्यायाम आणि संतुलित आहार जितका महत्त्वाचा आहे, तितक्याच काही चुकीच्या खाण्याच्या सवयी (common eating habits that cause heart attack) धोकादायक ठरतात.
आपल्या डेली रुटीनमध्ये खाण्यापिण्याच्या काही विशिष्ट सवयी कळत-नकळतपणे (4 Common Eating Habits Which Increase the Risk of Heart Attack) आपल्या हृदयावर अतिरिक्त ताण निर्माण करतात. आपण रोज काय आणि कसे खातो, याचा थेट परिणाम रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरेच्या पातळीवर होतो. जर आपल्याला दीर्घकाळ निरोगी आणि तंदुरुस्त राहायचे असेल, तर हृदयाचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या काही खाण्यापिण्याच्या सवयी वेळीच ओळखणे आणि त्या बदलणे अत्यंत आवश्यक आहे.
चूक १ :- रात्री उशिरा जेवण करणे :-
जेव्हा आपण रात्री उशिरा जेवण करतो, तेव्हा आपल्या शरीराला झोपेत असतानाही अन्न पचवण्याचे काम करावे लागते. यामुळे झोपेचे चक्र तर बिघडते सोबतच रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी देखील बिघडू शकते. म्हणूनच, रात्री उशिरा जेवण करणाऱ्यांमध्ये हृदयाच्या आजारांचा धोका वाढलेला दिसून येतो.
चूक २ :- जास्त तळलेले-भाजलेले पदार्थ खाणे :-
समोसे, कचोरी, भजी, फ्रेंच फ्राईज आणि इतर तळलेले पदार्थ आपल्या हृदयासाठी अत्यंत धोकादायक ठरत आहेत. तळलेल्या आणि भाजलेल्या पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट आणि सॅचुरेटेड फॅटचे प्रमाण खूप जास्त असते. हे फॅट्स धमन्यांमध्ये प्लाक्स जमा करतात आणि त्यांना अरुंद करतात. यामुळे रक्ताभिसरणास अडथळा येतो आणि हार्ट अॅटॅकचा धोका वाढतो. या पदार्थांमुळे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.
चूक ३ :- जास्त प्रमाणात रिफाईंड कार्ब्स खाणे :-
मैदा, पांढरा तांदूळ, साखर आणि यांपासून तयार केलेल्या पदार्थांमध्ये रिफाईंड कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात असतात. हे कार्ब्स शरीरात वेगाने साखरेत रूपांतरित होतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते. काही काळानंतर, जास्त प्रमाणात रिफाईंड कार्ब्स खाणे हे लठ्ठपणा, मधुमेह आणि हाय ब्लड प्रेशरचे कारण बनू शकते. या सर्व लहान - मोठ्या समस्या हृदयाच्या आजारांसाठी धोक्याचा इशारा आहेत.
चूक ४ :- जास्त प्रमाणात साखर आणि मीठ खाणे :-
जास्त प्रमाणांत मीठ आणि साखर खाणे हे हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. दररोज मीठ जास्त प्रमाणांत खाल्ल्यास हृदयावर जास्त दाब पडतो आणि हृदयाच्या आजारांचा धोका वाढतो, कारण त्यामुळे हाय ब्लड प्रेशरची समस्या निर्माण होते. यासोबतच, जास्त साखर खाल्ल्याने लठ्ठपणा, मधुमेह आणि हाय ट्रायग्लिसराइड्सचा धोका वाढू शकतो. या सर्व लहान - मोठ्या समस्या एकत्रितपणे हृदयाच्या आजारांना आमंत्रण देतात.