थंड- गरम खाताच दात ठणकतात? ३ उपाय- दात होतील मजबूत, पिवळटपणा जाऊन मोत्यासारखे चमकतील
Updated:February 25, 2026 09:30 IST2026-02-25T09:25:58+5:302026-02-25T09:30:07+5:30

बऱ्याच जणांना हा त्रास असतो की खाण्यात काही थंड किंवा गरम पदार्थ आले किंवा काही गोड पदार्थ खाल्ले की लगेच दातांना झिणझिण्या आल्यासारख्या होतात. दाढा ठणकू लागतात.(3 tips to get rid of sensitive teeth)
हा त्रास टाळायचा असेल तर पुढे सांगितलेले काही उपाय नियमितपणे करून पाहा. पण हा त्रास जास्त दिवस अंगावर न काढता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही चांगले.(how to get rid of sensitive teeth?)
आठवड्यातून एकदा मीठ आणि हळद एकत्र करा आणि त्याने ब्रश करा. हळदीमधले ॲण्टीबॅक्टेरियल घटक दातांसाठी चांगले असतात.(home hacks for strong teeth)
बेकिंग सोडा देखील दातांसाठी खूप चांगला असतो. यासाठी मीठ आणि बेकिंग सोडा एकत्र करा आणि त्याने ब्रश करून अगदी लगेचच एखाद्या मिनिटांत गुळण्या करा. दातांची संवेदनशीलता कमी होऊन दात मजबूत होतील. तसेच दातांचा पिवळेपणाही कमी होईल.
ब्रश अगदी हलक्या हाताने करावा. खूप जोर लावून आणि जास्त वेळ ब्रश केल्याने दातांचा वरचा थर निघून जातो आणि दात जास्त संवेदनशील होत जातात.
दातांच्या झिणझिण्या कमी होण्यासाठी लवंगाचं तेल ठणकणाऱ्या दातांना नियमितपणे लावा. काही दिवसांतच खूप चांगला फरक दिसून येईल.
वर्षातून एकदा तरी दातांची तपासणी व्हायलाच हवी. यामुळे दातांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.