व्हिटॅमिन बी १२ वाढण्यासाठी २ घरगुती शाकाहारी पदार्थ- बी १२ ची कमतरता भरून काढणारे साधेसोपे उपाय
Updated:November 7, 2025 13:26 IST2025-11-07T12:55:13+5:302025-11-07T13:26:56+5:30

शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असेल तर ती भरून काढण्यासाठी पुढे दिलेले काही उपाय करून पाहा...
बहुतांश शाकाहारी लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता दिसून येते. त्यासाठी आपण आपल्या आहारात काही बदल केले किंवा काही पदार्थ आवर्जून खाल्ले तर ती कमतरता भरून निघू शकते.
त्यासाठी काय उपाय करावे याची ही खास माहिती.. पहिला उपाय म्हणजे दहीभात खाणे. व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता भरून काढण्यासाठी एका विशिष्ट पद्धतीने केलेले दहीभात खाणे खूप फायदेशीर ठरते.
त्यासाठी तांदूळ आधी भाजून घ्या. त्यानंतर ते पातेल्यामध्ये शिजवून त्याचा भात करा. हा भात एका मातीच्या भांड्यात काढा. त्यावर दही घाला आणि २ तास तो भात तसाच झाकून ठेवा. नंतर त्यावरून मोहरी, जिरे, हिंग, कडिपत्ता, हिरव्या मिरच्या अशी फोडणी घाला. हा भात नाश्त्यामध्ये खा.
दुसरा उपाय म्हणजे जास्वंदाची २ ते ३ फुले स्वच्छ धुवून घ्या आणि हातानेच ती थोडी कुस्करून घ्या.
यानंतर ती फुलं ग्लासभर पाण्यात घालून ठेवा. एखाद्या तासाने ते पाणी गाळा आणि त्यात थोडं लिंबू पिळून ते प्या. महिनाभरात खूप चांगला फरक दिसेल अशी माहिती डॉक्टरांनी vaidicayurvedpanchkarma1 या इंस्टाग्राम पेजवर सांगितली आहे. पण हे उपाय करण्यापुर्वी तुमच्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला मात्र नक्की घ्यावा.