1 / 8बागेतल्या रोपांची आपण कितीही काळजी घेतली तरी असं बऱ्याचदा असं होतंच की एखादं रोप अगदी सुकून जातं.(what to do if plant is dying?)2 / 8सुरुवातीला त्याची पानं पिवळी पडून गळू लागतात (How To Revive A Dying Plant?). नंतर त्याला नविन पानं फुटणं बंद होतं आणि हळूहळू ते रोप पुर्णपणे सुकून जातं.(best home hacks for Revive A Dying Plant)3 / 8अशा सुकून, वाळून गेलेल्या रोपाला पुन्हा एकदा हिरवंगार, टवटवीत करायचं असेल तर त्याला हे खास टॉनिक एकदा द्या.. काही दिवसांपुर्वी हेच रोप सुकून, वाळून गेलेलं होतं यावर तुमचाच विश्वास बसणार नाही. 4 / 8हा उपाय करण्यासाठी एक ग्लास पाण्यामध्ये १ चमचाभर तांदूळ ८ ते १० तास भिजत घाला. यानंतर हे पाणी गाळून घ्या.5 / 8आता गाळून घेतलेल्या पाण्यामध्ये १ चमचा बेकिंग सोडा घाला. बेकिंग सोड्यामुळे रोपावर कोणता रोग पडला असेल तर तो निघून जाण्यास मदत होते.6 / 8आता त्याच पाण्यात १ चमचा व्हाईट व्हिनेगर घाला आणि पाणी ३ ते ४ तासांसाठी झाकून ठेवा.7 / 8हे पाणी जे रोप पुर्णपणे वाळून, सुकून गेलं आहे त्या रोपावर शिंपडा तसेच त्याच्या कुंडीतल्या मातीतही घाला.8 / 8काही दिवसांतच हे रोप छान फुलून येईल आणि हिरवंगार होईल. ट्राय करून पाहा.