Join us
Daily Top 2 Weekly Top 5

बाल्कनीत 'ही' ५ फुलांची रोपं लावा; रंगेबिरंगी फुलपाखरांनी भरेल बाल्कनी-घराचं वाढेल सौंदर्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 09:10 IST

1 / 8
तुमच्या बाल्कनीमध्येही रंगेबिरंगी फुलपाखरं यावी असं तुम्हाला वाटत असेल तर काही रोपं तुमची मदत करू शकतात. (5 Plants That attract Butterflies)
2 / 8
फुलपाखरांना आकर्षीत करणारी ही ५ रोपं तुम्ही लावली तर भरपूर फुलपाखरं येतील आणि वातावरणही चांगलं राहील.
3 / 8
लँटाना फुलपाखरांचे सर्वात आवडते रोप मानले जाते. या छोटया छोट्या फुलांचा गुच्छ लाल, पिळा, नारंगी, गुलाबी या रंगात असतो. याचा विशिष्ट सुवास फुलपाखरांना आकर्षीत करतो.
4 / 8
झेंडूची फुलं तीव्र वास आणि पिवळ्या रंगासाठी ओळखली जातात. पिवळ्या रंगांकडे फुलपाखरं आकर्षीत होतात.
5 / 8
पेंटासची फुलं छोट्या चांदण्यांप्रमाणे दिसतात. गडद लाल गुलाबी रंगांची फुलं फुलपाखरांना आकर्षीत करतात.
6 / 8
मेक्सिकन पेटुनियाची नीळी आणि वांगी रंगाची फुलं अशा लोकांसाठी आहेत ज्यांच्या बाल्कनीत थेट सुर्यप्रकाश येतो. कारण सकाळच्यावेळी ही फुलं उमलतात.
7 / 8
कढीपत्त्याचे रोप फुलपाखरांना आवडते. हे रोप कॉमन मॉर्मन आणि लाईम बटरफ्लाय साठी होस्ट प्लांटचे काम करते. ही पानं खाऊन कढीपत्ताचे रोप वाढते.
8 / 8
फुलपाखरांना आकर्षीत करण्यासाठी रोपं अशा ठिकाणी ठेवा जिथे ५ते ६ तास ऊन येतं. कारण फुलपाखरांना उन्हात उडायला आवडतं.
टॅग्स : बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स