1 / 6फुलझाडांची आवड असेल तर उन्हाळ्यात किंवा खरंतर उन्हाळ्याच्या आधीच ही काही रोपं तुमच्या बागेत लावायलाच हवीत (summer special flowering plants). कारण या रोपांसाठी उन्हाळा हा उत्तम सिझन असून त्यांची खूप छान वाढ होते आणि भरपूर फुलंही येतात.(5 flowering plants that blooms in summer)2 / 6त्यापैकी पहिलं रोप आहे मोगरा. मोगऱ्याचा मंद सुगंध अंगणात, घरात दरवळू लागला की मन कसं फ्रेश होऊन जातं. सगळा थकवा गळून जातो.(flowering plants that easily grows in summer)3 / 6मधुमालती हे देखील एक अतिशय सुंदर सुवासिक फुल. याचा वेल या दिवसांत नक्की गॅलरीमध्ये, अंगणात, गेटवर चढवा. पांढरट, गुलाबी फुलं पाहूनच छान वाटेल.4 / 6मोगऱ्यासारखाच सुगंध असणारं पण अतिशय नाजुक असणारं दुसरं एक रोप म्हणजे मधुकामिनी. ही फुलं रात्री फुलतात आणि आजुबाजुचं वातावरण प्रसन्न करून टाकतात.5 / 6रातराणीचं रोपही या दिवसांत नक्की लावा. रातराणीच्या फुलाचा सुगंधही अतिशय मुग्ध करणारा असतो. १० ते १२ इंच आकाराच्या कुंडीत तुम्ही रातराणी लावू शकता.6 / 6बोगन वेलीलाही या दिवसांत खूप फुलं येतात. पण त्याला सुगंध मात्र नसतो. पण तरीही वेगवेगळ्या रंगाच्या फुलांनी घराच्या आजुबाजुचा परिसर फुलवून टाकायचा असेल तर बोगन वेल अवश्य लावा.