1 / 8मोगऱ्याचे रोप त्याच्या सुवासिक कळ्या आणि पांढऱ्या फुलांसाठी फारच (easy jasmine plant care at home) लोकप्रिय आहे. जर या रोपाची योग्य काळजी घेतली, तर त्याला वर्षभर भरपूर (jasmine plant tips for more flowers) फुले येऊ शकतात. मोगऱ्याच्या रोपाला योग्य वेळी खत, पाणी आणि त्याची काळजी घेतल्यास फुलांची संख्या अनेक पटींनी वाढवता येते. यासाठी ४ आठवड्यात खास ४ उपाय केले तर महिन्याभरात रोपाची सुंदर वाढ होऊन, पांढराशुभ्र मोगरा फुलून येईल. 2 / 8१. पहिल्या आठवड्यात, रोपाला ताकद देण्यावर (how to make jasmine plant bloom) लक्ष केंद्रित केले पाहिजे. यासाठी, कुंडीतील रोपाच्या मातीत मूठभर शेणखत किंवा व्हर्मी कंपोस्ट (गांडूळ खत) टाकावे. त्यानंतर, थोडे पाणी द्यावे जेणेकरून खत मुळांपर्यंत पोहोचेल. यामुळे रोपाला नवीन ऊर्जा मिळते आणि मूळ अधिक मजबूत होतात. 3 / 8२. दुसऱ्या आठवड्यात आपण वापरलेल्या चहा पावडरचे पाणी कुंडीतील मातीत मिसळू शकता. वापरलेल्या चहा पावडरचे पाणी रोपांच्या वाढीसाठी फायदेशीर असते. 4 / 8३. तिसऱ्या आठवड्यात आपण केळीच्या सालीचे खत रोपाच्या कुंडीत घालू शकता. केळीच्या सालींमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅश आणि फॉस्फरस असते, ज्यामुळे फुलांची संख्या आणि त्यांचा आकार वाढतो. यासाठी केळीच्या साली उन्हांत व्यवस्थित वाळवून त्या मिक्सरला वाटून त्याची बारीक पावडर करून घ्यावी हि पावडर मातीत मिसळा. तसेच केळीच्या साली पाण्यांत भिजवून आपण ते पाणी देखील रोपाला घालू शकतो. यामुळे मोगऱ्याला जास्त आणि आकाराने मोठी फुले येतात.5 / 8४. चौथ्या आठवड्यात रोपाला सीवीड लिक्विड फर्टिलायझर दिले जाते. ५ मिली सीवीड लिक्विड १ लिटर पाण्यात मिसळून रोपाला दिल्यास त्याची वाढ वेगाने होते आणि फुलांची गुणवत्ताही सुधारते. तसेच, यामुळे रोपांची रोगांशी लढण्याची त्याची क्षमता देखील वाढते.6 / 8५. फुलं उमलल्यावर रोपाची स्वच्छता करणे खूप महत्त्वाचे आहे. सुकलेली फुले लगेच तोडून टाकावीत जेणेकरून नवीन कळ्या लवकर येऊ शकतील. जर रोपटे स्वच्छ राहिले, तर त्याला सतत नवीन फांद्या आणि कळ्या येतील आणि फुलांची संख्या देखील वाढेल.7 / 8६. मोगऱ्याला दररोज ५ ते ६ तास थेट सूर्यप्रकाश मिळणे गरजेचे असते. याव्यतिरिक्त, प्रत्येक हंगामानंतर हलकी छाटणी करणे देखील आवश्यक असते, जेणेकरून रोपाला नवीन फांद्या फुटतील. कीटकांच्या हल्ल्यापासून रोपाला वाचवण्यासाठी, महिन्यातून एक ते दोन वेळा कडुलिंबाच्या तेलाची फवारणी करणे फायदेशीर ठरते.8 / 8७. नियमित खत, वेळेवर पाणी, सूर्यप्रकाश आणि काळजी घेतल्यास, मोगऱ्याचे रोप आपले अंगण सुगंधाने भरून टाकेल आणि प्रत्येक हंगामात सुंदर फुलांनी भरलेले दिसेल.