Join us

झेंडूच्या रोपाला ‘या’ दोन गोष्टींचं खत घाला, दिवाळीपर्यंत पिवळ्या फुलांनी बहरेल झेंडू...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2025 09:45 IST

1 / 9
दसरा आणि दिवाळी या सणांना झेंडूच्या फुलांना विशेष महत्त्व असते. या दोन्ही (how to grow marigold plant faster at home) सणात झेंडूची पिवळी आणि केशरी फुलं (Increase marigold plant growth faster & get more genda flower) सजावटीसाठी खास वापरली जातात.
2 / 9
आपल्यापैकी बरेचजण बाल्कनीतील कुंडीत झेंडूची रोपं लावतात, पण बऱ्याचदा (tips to get more flowers on genda plant) त्यांना पाहिजे तितकी भरपूर फुलं येत नाहीत. सणावाराला बाजारातून फुलं विकत घेण्यापेक्षा आपल्या बाल्कनीतल्या झेंडूच्या रोपावरच भरपूर फुलं यावीत असं प्रत्येकालाच वाटतं.फक्त रोप लावून उपयोग नाही, तर त्यांना योग्य पोषण आणि देखभाल मिळाली तर तुमची बाल्कनी दसरा-दिवाळीच्या काळात झेंडूच्या फुलांनी अक्षरशः बहरून जाईल.
3 / 9
अशावेळी काही सोप्या टिप्स फॉलो केल्या तर झेंडूचं रोप दाट हिरवं दिसेल आणि भरपूर पिवळ्या-केशरी फुलांनी बहरून जाईल.
4 / 9
१. झेंडूच्या रोपात कोणत्याही प्रकारचा कीटक, कीड दिसली तर कोणतंही रासायनिक कीटकनाशक वापरू नका. पाण्यात कडुलिंबाचं तेल मिसळून फवारणी करावी. असे केल्यानं झेंडूचं रोप हिरवं होईल.
5 / 9
२. झेंडूच्या झाडाला अधिक फुले येण्यासाठी तुम्ही पोटॅश, डीएपी, शेणखत किंवा मोहरीची पेंड वापरू शकता. महिन्यातून एकदा झेंडूच्या झाडाला मुठभर गांडूळ खत घालण्याची सवय करा. असे केल्याने सर्व सूक्ष्म पोषक घटकांची पूर्तता होईल.
6 / 9
३. रोपाला कळ्या येऊ लागताच दिवसभर ऊन दाखवावे. कारण झेंडूच्या रोपाला फुलण्यासाठी भरपूर सूर्यप्रकाश हवा असतो. जेव्हा रोपाला कळ्या येऊ लागतील, तेव्हा रोपाला अशा ठिकाणी ठेवा जिथे त्याला दिवसातून किमान ५ ते ६ तास थेट ऊन मिळेल. उन्हामुळे कळ्या वेगाने उमलतात आणि मोठी व जास्त फुले येतात.
7 / 9
४. जर तुम्ही नवीन रोप लावले असेल, तर त्याची वरची पाने आणि छोट्या फांद्या यांची वेळीच छाटणी करा. छाटणी केल्याने रोपाची वाढ एका बाजूला न होता चारही बाजूंनी पसरते, ज्यामुळे त्याला जास्त फांद्या येतात आणि प्रत्येक फांदीवर भरपूर फुलं येतात.
8 / 9
५. झेंडूच्या रोपाला ओलावा गरजेचा असतो. त्यामुळे मातीला पूर्णपणे सुकू देऊ नका. जेव्हा माती हलकी सुकलेली दिसेल, तेव्हा रोपाला पाणी द्या. परंतु, लक्षात ठेवा की जास्त पाणी देऊ नका, नाहीतर मुळांमध्ये फंगस लागू शकते. जास्त पाणी दिल्यामुळे रोप कोमेजून देखील होते. पाणी पानांवरून टाकण्याऐवजी थेट मुळांमध्ये टाकावे.
9 / 9
६. झेंडूच्या रोपासाठी वर्मीकंपोस्ट किंवा शेणखत देखील वापरू शकता. याव्यतिरिक्त, कांदे आणि केळीच्या साली पाण्यात २ ते ३ दिवस भिजत ठेवा किंवा गरम पाण्यात रात्रभर भिजवा. या पाण्याचा वापर केल्यास रोपांची वाढ वेगाने होते. केळीच्या सालीमध्ये पोटॅशिय भरपूर प्रमाणात असते, जे फुलांच्या वाढीसाठी सर्वात आवश्यक पोषक तत्व आहे.
टॅग्स : बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सपाणी