1 / 8आपण भुईमूगाच्या शेंगा खाल्ल्यानंतर त्याची टरफलं शक्यतो कचरा समजून (how to use peanut shells for plants) फेकून देतो. परंतु, आपल्या घरात असलेल्या रोपांच्या कुंडीतील मातीसाठी हा टाकाऊ कचरा किती अमूल्य खजिना ठरू शकतो. विशेषत: टेरेस गार्डनिंग किंवा बाल्कनीतील रोपांसाठी ही टरफलं अतिशय फायदेशीर ठरतात. 2 / 8भुईमुगाच्या टरफलांमध्ये नैसर्गिक कार्बन, नायट्रोजन, पोटॅशियम आणि कॅल्शियमसारखे (benefits of groundnut shells for gardening) पोषक घटक असतात, जे मातीत मिसळल्यावर तिची उपजाऊ शक्ती वाढवतात आणि रोपांची वाढ वेगाने होते. ही टरफलं कुंडीत मिसळल्याने माती हलकी, हवेशीर आणि ओलावा धरून ठेवणारी बनते. शिवाय ती जैविक खताप्रमाणे कार्य करून मातीतील जंतूंचा समतोल राखते, त्यामुळे रोपांच्या मुळांना श्वास घेणं सोपं होतं आणि पाणी टिकून राहतं.3 / 8ही टरफलं म्हणजे केवळ कचरा नाही, तर पोषक तत्वांनीयुक्त असे नैसर्गिक कंपोस्ट खत आहे. बाजारातून महागडी खते विकत घेण्याऐवजी, तुमच्या स्वयंपाकघरातील या 'टाकाऊ' पदार्थाचा उपयोग करून रोपांची चांगली वाढ होण्यास मदत करु शकता. 4 / 8भुईमुगाच्या शेंगांची टरफलं वजनाने हलकी आणि मोठी असल्यामुळे मातीत मिसळल्यावर माती मोकळी आणि सैलसर ठेवतात. यामुळे कुंडीतील पाण्याचा उत्तम पद्धतीने निचरा होतो आणि जास्त पाणी साचून मुळं कुजण्याची समस्या टाळली जाते. टरफलांमुळे मातीमध्ये हवेचा संचार चांगला होतो. त्यामुळे मुळांना श्वास घेण्यासाठी पुरेशी हवा मिळते, ज्यामुळे मुळांची वाढ जलद होते.5 / 8भुईमुगाची टरफलं हळूहळू कुजतात. कुजताना, त्यातील नैसर्गिक पोषण मातीमध्ये मिसळले जाते. हे टरफलं कंपोस्ट खत म्हणून तुमच्या रोपाला दीर्घकाळ पोषण पुरवते, ज्यामुळे रोपे अधिक हिरवीगार आणि निरोगी दिसतात.6 / 8टरफलांचा वापर मल्चिंग म्हणजेच कुंडीतील मातीच्या पृष्ठभागावर आच्छादन म्हणून केला जाऊ शकतो. हे आच्छादन उन्हाळ्यामध्ये मातीतील ओलावा टिकवून ठेवते आणि मातीला जास्त गरम होण्यापासून वाचवते. यामुळे तण वाढण्याचे प्रमाणही कमी होते.7 / 8रोपासाठी माती तयार करताना, माती आणि भुईमुगाच्या टरफलांचे तुकडे ३:१ (तीन भाग माती आणि एक भाग टरफलं) या प्रमाणात मिसळून वापरा. टरफलं थेट कंपोस्ट बिनमध्ये टाकल्यास, त्यांचे कंपोस्ट खत लवकर तयार होते. या साध्या उपायामुळे रोपांना नैसर्गिकरित्या पोषण मिळते.8 / 8५. टरफलं शक्य असल्यास लहान तुकड्यांमध्ये तोडून घ्यावे किंवा त्यांना थोडे क्रश करा. यामुळे ते मातीत लवकर मिसळतात आणि कुजण्याची प्रक्रिया जलद होते. या सोप्या ट्रिक्स वापरून आपण घरातल्या टाकाऊ पदार्थाचे उत्तम खत बनवून रोपांना हिरवेगार करु शकता.