Join us
Daily Top 2 Weekly Top 5

पीस लीलीला फुलं येतच नाहीत- पानंही पिवळी पडतात? ४ टिप्स- भरपूर येतील फुलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2026 14:16 IST

1 / 6
पीस लीली हे एक सुंदर रोप. एखाद्या आकर्षक कुंडीत लावून ते आपण आपल्या घरातही ठेवू शकतो. हे रोप घरात ठेवल्याने घराला छान शोभा येते. त्यामुळे काही जण हौशीने ते त्यांच्या हॉलमध्ये, बेडरुममध्ये किंवा घरातल्या इतर भागात ठेवतात.
2 / 6
पण काही जणांची मात्र अशी तक्रार आहे की पीस लीलीच्या पानांची टोकं सुकायला लागतात. आणि त्यांना फुलंच येत नाहीत.तुमच्याही पीस लीलीच्या रोपांचं असंच होत असेल तर पुढे सांगितलेल्या काही गोष्टी लक्षात ठेवा. जेणेकरून ते नेहमीच छान हिरवंगार आणि टवटवीत राहील. शिवाय त्याला भरपूर फुलंही येतील.
3 / 6
पीस लीलीच्या बाबतीतली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे रोप इनडोअर असलं तरी ते आठवड्यातून काही दिवस अशा ठिकाणी ठेवावं जिथे त्याला अप्रत्यक्षपणे चांगलं ऊन मिळेल. थेट ऊन त्याच्यावर पडणार नाही याची मात्र काळजी घ्या. असं केलं तरच त्याची चांगली वाढ होते. त्याला कायम सावलीत ठेवून चालत नाही.
4 / 6
दुसरी गोष्ट म्हणजे पीस लीला खूप पाणी घालू नका. कारण अतिपाण्याने त्याची रोपं सडतात. ते खराब होतं. त्यामुळे उन्हाळ्यात त्याला रोज पाणी दिलं तरी अगदी थोडंसंच पाणी घालावं.
5 / 6
पीस लीलीच्या पानांची टोकं काेरडी पडली असतील तर याचा अर्थ असा होतो की त्याला पुरेसं पोषण मिळत नाहीये. अशावेळी त्याला लिक्विड फर्टिलायझर घाला किंवा केळीच्या सालींचे पानी तयार करून ते डायल्यूट करून द्या.
6 / 6
पीस लीलीच्या आजुबाजुला त्याच्यासारखीच इतर इनडोअर प्रकारातली रोपं ठेवा. यामुळे त्याची वाढ जास्त चांगली होते आणि फुलं येण्यासही मदत होते.
टॅग्स : बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सपाणीफुलंखतेकेळी