गुलाबाची पानं पिवळी होतात-फुलंच येत नाही? १ खास ट्रिक, लालबुंद गुलाबांनी बहरेल रोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 19:51 IST
1 / 7गुलाबाच्या रोपाच्या (Rose Plant) चांगल्या वाढीसाठी वेळोवेळी व्यवस्थित खत देणं महत्वाचं आहे. ज्यामुळे नवीन पालवी फुटते आणि नव्या कळ्या येतात. (How To Make Rose Plant Bloom)2 / 7 अनावश्यक वाढलेल्या किंवा खराब झालेल्या फांद्या कापून टाका. गुलाबाला वेळोवेळी खत द्या ज्यामुळे रोपाला पोषण मिळेल.3 / 7जर तुम्ही कुंडीत रोप लावत असाल तर आकाराने मोठी कुंडी निवडा. जेणेकरून रोपाची वाढ चांगली होईल. रोपाची माती भुसभुशीत आणि सुपीक असावी.4 / 7गुलाबाच्या रोपाला पाण्याची गरज आहे की नाही ते पाहून पाणी द्या. माती नेहमी ओलसर ठेवा. त्यात पाणी साचू देऊ नका.5 / 7दुधात कॅल्शियम असते जे रोपांच्या चांगल्या वाढीसाठी आणि फुलं येण्यासाठी महत्वाचे असते. कच्च्या दुधात पाणी मिसळून पातळ द्रावण तयार करा आणि ते मातीत किंवा पानांवर फवारा.6 / 7ताक आणि दह्यामध्ये पाणी मिसळून पातळ द्रावण तयार करा. ताकामध्ये कॅल्शियम,प्रोटीन आणि चांगले बॅक्टेरिया असतात जे रोपांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरतात. महिन्यातून एकदा हे द्रावण रोपाच्या मातीत घाला.7 / 7लाकडी किंवा शेणाच्या गोवऱ्यांची राख देखील खत म्हणून वापरू शकता कारण यात पोटॅशियम आणि इतर खनिजं असतात. राखेचा वापर जपून आणि कमी प्रमाणात करावा यामुळे मातीचा पीएच बदलू शकतो.