Join us

सुकलेलं आलं फेकू नका, फुलझाडांसाठी 'या' पद्धतीने वापरा, टवटवीत फुलांनी बहरतील रोपं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2025 20:23 IST

1 / 7
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे मस्त रिमझिम पावसात, थंडगार वातावरणात आलं घातलेला गरमागरम चहा पिण्याची खूप इच्छा होतेच.. त्यामुळे आपल्या घरात या दिवसांत आलं असतंच..
2 / 7
बऱ्याचदा असंही होतं की आलं घेऊन बरेच दिवस झाले असतील तर ते सुकून जातं. कोमेजतं. असं आलं मग आपण फेकून देतो. पण ते टाकून देऊ नका. कारण तुमच्याकडच्या फुलझाडांसाठी ते एक खूप चांगलं खत ठरू शकतं. बघा त्याचा रोपांसाठी नेमका कसा उपयोग करून घ्यायचा.(best fertilizer for flowering plants)
3 / 7
एका भांड्यात अर्धा लीटर पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये आल्याचे बारीक बारीक तुकडे करून टाका.
4 / 7
आता त्याचा पाण्यामध्ये २ ते ३ चमचे व्हाईट व्हिनेगर घाला. राेपांची मुळं जमिनीत पक्की होण्यासाठी व्हिनेगर उपयुक्त ठरतं.
5 / 7
आता त्या मिश्रणात थोडी खडूची किंवा पाटीवरच्या पेन्सिलींची पावडर घाला. कारण त्यांच्यातून रोपांना भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळतं.
6 / 7
आता हे मिश्रण १२ ते १५ तास झाकून ठेवा आणि त्यानंतर ते राेपांना घाला.
7 / 7
महिन्यातून एक- दोन वेळा तुम्ही हा उपाय करू शकता. त्यामुळे फुलझाडांना भरपूर प्रमाणात नायट्रोजन आणि पोटॅशियम मिळतं आणि त्यामुळे रोपांना फुलं येण्याचं प्रमाण वाढतं.
टॅग्स : बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सपाणीखतेफुलं