तुम्ही पपई खा आणि सालं रोपांना द्या! कुंडीतल्या रोपांना हे खत देते ताकद, येतात भरपूर फुलं

Updated:March 20, 2026 15:13 IST2026-03-20T15:05:47+5:302026-03-20T15:13:48+5:30

तुम्ही पपई खा आणि सालं रोपांना द्या! कुंडीतल्या रोपांना हे खत देते ताकद, येतात भरपूर फुलं

पपई आरोग्यासाठी किती चांगली आहे हे आपल्याला माहितीच आहे. शिवाय पपई हे असं एक फळ आहे जे सर्वांच्या खिशाला परवडू शकतं. पपई डोळ्यांसाठी, त्वचेसाठीही अतिशय चांगली असते.

तुम्ही पपई खा आणि सालं रोपांना द्या! कुंडीतल्या रोपांना हे खत देते ताकद, येतात भरपूर फुलं

याच पपईची सालं रोपांसाठी खूपच फायदेशीर ठरतात. त्यामुळेच तर तुम्ही पपई खा आणि तिची सालं मात्र रोपांना द्या (how to make fertilizer for plants from papaya peel?). कारण पपईच्या सालांपासून रोपांसाठी खूप उत्तम दर्जाचं खत तयार करता येतं. ते कसं तयार करायचं ते पाहूया...(how to use papaya peel for plants growth?)

तुम्ही पपई खा आणि सालं रोपांना द्या! कुंडीतल्या रोपांना हे खत देते ताकद, येतात भरपूर फुलं

साधारण मध्यम आकाराची पपई असेल तर तिच्या सालांचे बारीक बारीक काप करा आणि ते दिड लीटर पाण्यात भिजत घाला.

तुम्ही पपई खा आणि सालं रोपांना द्या! कुंडीतल्या रोपांना हे खत देते ताकद, येतात भरपूर फुलं

याच पाण्यात साधारण ५० ते ६० ग्रॅम एवढा गूळ बारीक करून घाला. २४ तासांसाठी हे मिश्रण उन्हामध्ये झाकून ठेवा..

तुम्ही पपई खा आणि सालं रोपांना द्या! कुंडीतल्या रोपांना हे खत देते ताकद, येतात भरपूर फुलं

यानंतर हे पाणी गाळून घ्या आणि मग रोपांना द्या. हे पाणी मातीचा कस वाढविण्यास मदत करतं. त्या पाण्यातून भरपूर प्रमाणात पोटॅशियम आणि कॅल्शियम मिळतं जे फुलझाडांसाठी अतिशय फायदेशीर ठरतं.

तुम्ही पपई खा आणि सालं रोपांना द्या! कुंडीतल्या रोपांना हे खत देते ताकद, येतात भरपूर फुलं

कुंडीतल्या रोपांची चांगली वाढ होतत नसेल किंवा त्यांना भरपूर फुलं येत नसतील तर पपईचा हा उपाय एकदा करून बघाच..