1 / 6सध्या उन्हाचा कडाका एवढा वाढला आहे की त्यामुळे कुंडीत लावलेली रोपंही सुकून जात आहेत.(how to keep plants fresh in summer?)2 / 6रोज पाणी देऊनही रोपांची हवी तशी वाढ होत नाही. कारण या दिवसात रोपांनाही उष्णता सहन होत नाही. 3 / 6ज्याप्रमाणे आपण डिहायड्रेशन टाळून शरीराला थंडावा मिळावा यासाठी ताक, नारळपाणी अशी पेयं घेत असतो, त्याचप्रमाणे रोपांनाही काही पदार्थ देणं आवश्यक असतं. 4 / 6ते पदार्थ नेमके कोणते ते पाहूया.. त्यासाठी साधारण ५ लीटर पाणी घ्या. त्यामध्ये १ ग्लास ताक घाला.5 / 6यानंतर त्यामध्ये १ चमचा हळद घाला. आणि साधारण २० ते २५ ग्रॅम एवढा गूळ घाला.6 / 6हे पाणी पंधरा दिवसातून एकदा कुंडीतल्या मातीमध्ये घाला. तसेच रोपांवरही शिंपडा. यामुळे रोपांना नक्कीच थंडावा मिळेल. पानं हिरवीगार आणि टवटवीत राहतील.