1 / 7पावसाळ्यात घरात माशा, चिलटं होण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं असतं. घरात कुठेही ओलसर, खरकटे पदार्थ राहिले तर त्याठिकाणी लगेचच माशा आणि चिलटं घोंगावू लागतात.2 / 7घरातल्या माशा आणि चिलटं कमी करायचे असतील तर घरात काही रोपं आणून ठेवा. यामुळे तुमच्या घरातल्या माशा आणि चिलटं तर जातीलच पण घरातला कोंदट वासही कमी होईल. याशिवाय रोपांमुळे तुमच्या घराला अधिक छान लूकही येईल.3 / 7पहिलं रोप आहे स्पायडर प्लांट. स्वयंपाक घरात डायनिंग टेबलवर, सिंकजवळ या दिवसांत खूप माशा होतात. त्याठिकाणी स्पायडर प्लांट ठेवलं तर माशा आणि चिलटांचं प्रमाण नक्कीच कमी होईल.4 / 7माशांना दूर पळवून लावणारं रोप म्हणजे पुदिना. भरपूर सुर्यप्रकाश जर घरातल्या एखाद्या खिडकीमध्ये येत असेल तर तिथे पुदिन्याची छोटीशी कुंडी आणून ठेवा.5 / 7अंगणात किंवा बाल्कनीमध्ये झेंडूचं रोप लावल्याने तिथे घोंगावणाऱ्या माशांचं प्रमाणही कमी होतं. 6 / 7लवेंडर रोपाला नाजूक सुगंधी फुलं येतात. या फुलांच्या मंद सुगंधामुळे माशा आणि डास दूर पळतात. त्यामुळे घरातल्या माशा घालविण्यासाठी त्याचा खूप चांगला उपयोग होतो.7 / 7रोजमेरी या रोपाच्या आसपासही माशा फिरत नाहीत. त्यामुळे चांगला सुर्यप्रकाश येईल त्या ठिकाणी रोजमेरीची लहानशी कुंडी ठेवून पाहा. माशा दूर पळून जातील.