Join us

जास्वंदाला पांढरा मावा येतो-फुलंच नाही? मातीत १ पदार्थ कालवा, लालचुटूक जास्वंदानी बहरेल बाल्कनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 12:00 IST

1 / 7
घर प्रसन्न वाटण्यासाठी हवा खेळती (Gardening Tips) राहण्यासाठी प्रत्येकजण काही ना काहीतरी करत असतो. बरेचजण आपल्या बाल्कनीत फुल झाडं लावतात. फुल झाडांचा एक फायदा असा की चांगली वाढली तर तुम्हाला घरीच सुंदर सुंदर फुलं मिळतात आणि अशी झाडं दिसायलाही सुंदर असतात. जास्वंदाच्या रोपाला फुलं येण्यासाठी काही खास टिप्स पाहूया. (How To Grow Hibiscus Plant At Home)
2 / 7
जास्वंदाच्या रोपाला भरपूर सुर्यप्रकाश लागतो. दिवसातून कमीत कमी ५ ते ६ तास थेट सुर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी झाड ठेवा. कमी उन्हामुळे झाडाला फुलं येत नाहीत.
3 / 7
पाणी घातलाना झाडाची माती ओलसर राहील याची काळजी घ्या. मातीचा वरचा थर सुकल्यावरच पाणी घाला. पाणी कुंडीत साचून राहणार नाही याची काळजी घ्या.
4 / 7
जास्वंदाला फुलं येण्यासाठी पोटॅशियम आणि फॉस्फरसची गरज असते. केळीचे साल खत म्हणून रोपात घातल्यास रोपाला चांगली फुलं येतील. याशिवाय मोहोरीच्या पेंडीचा वापर केल्यानंही फुलांची वाढ चांगली होते.
5 / 7
जास्वंदाच्या रोपावर पांढरा मावा येऊ नये यासाठी कडुलिंबाच्या तेलाचा वापर प्रभावी ठरतो. १ लिटर पाण्यात ५ ते ६ मिली कडुलिंबाचं तेल आणि थोडं कोणतंही लिक्विड मिसळा. हे मिश्रण झाडांच्या पानांवर आणि फांद्यांवर स्प्रे करा.
6 / 7
चहा पावडरमध्ये नायट्रोजन, फॉस्परस असते हे खत जास्वंदाच्या रोपाला घातल्यानं वाढ चांगली होते.
7 / 7
तांदूळ आणि डाळ धुतल्यानंतर त्याचं उरलेलं पाणी तुम्ही रोपात घालू शकता किंवाा भाज्याचं पाणीही उत्तम ठरतं.
टॅग्स : बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स