Join us

बाल्कनीत छोट्या कुंडीत लावा वेलची; ५ गार्डनिंग टिप्स, सुगंधांनं वाटेल प्रसन्न आणि वेलही वाढेल जोमानं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 18:10 IST

1 / 7
वेलची (Cardamom)ही मसाल्याच्या पदार्थांची राणी मानली जाते. सुंगध, औषधी गुणांमुळे वेलचीला खूप महत्व आहे. वेलचीचे रेप बाल्कनीत कुंडीत लावणं सोपं आहे. पण ते उष्ण आणि दमट हवामानात वाढणारं असल्यामुळे योग्य काळजी देखील घ्यावी लागते. वेलचीच्या रोपाची काळजी कशी घ्यायची ते पाहू. (How To Grow Cardamom Plant At Home)
2 / 7
वेलचीला थेट सुर्यप्रकाश सहन होत नाही. जास्त उन्हामुळे रोप सुकू शकते म्हणून घरातील अशी जागा निवडा जिथे सावली मिळेल. खिडकीजवळ किंवा बाल्कनीतील जागा उत्तम ठरेल. जिथे मंद सुर्यप्रकाश येतो. (How To Grow Cardamom in Small Pot at Home)
3 / 7
वेलचीला दमट हवामान आवडते. रोपाला आद्रता मिळण्यासाठी आसपास पाण्याचा फवारा मारू शकता किंवा कुंडीखाली पाण्याचा ट्रे ठेवा. या रोपासाठी १५ ते ३५ अंश सेल्सियस तापमना योग्य मानलं जातं.
4 / 7
वेलचीसाठी सुपीक आणि पाण्याचा निचरा होणारी माती निवडा. तुम्ही ५० टक्के बागेची माती ३० टक्के कोकोपीट किंवा वाळू आणि २० टक्के गांडूळ खताचा वापर करू शकता किंवा शेणखतही घालू शकता. कोकोपीटमुळे मातीत ओलावा टिकून राहतो.
5 / 7
वेलचीच्या रोपाला भरपूर पाण्याची आवश्यकता असते. पण पाणी कुंडीत साचून राहू नये आणि माती हलकी ओलसर राहील याची काळजी घ्या. उन्हाळ्यात माती सुकल्यास दिवसांतून दोनवेळा पाणी द्यावे लागू शकते. हिवाळ्यात जास्त पाणी देऊ नका २ दिवसांनी किंवा माती कोरडी झाल्यावरच पाणी द्या.
6 / 7
वेलचीच्या वाढीसाठी सेंद्रीय खत वापरा, रोपाला वर्षातून दोन ते तीनवेळा गांडूळ खत किंवा शेणखत द्या. ज्यामुळे रोपाला आवश्यक घटक मिळतील.
7 / 7
रोपाला व्यवस्थित आकार देण्यासाठी आणि सुकलेली पानं काढून टाकण्यासाठी छाटणी करा. वेलचीच्या रोपावर सहसा किड आढळत नाही. पण आढळल्यास कडुलिंबाच्या तेलाची फवारणी करा.
टॅग्स : बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स