Join us

कुंडीतली घट्ट झालेली माती बदलायला वेळ नाही? घ्या उपाय, माती होईल भुसभुशीत- रोपंही वाढतील जोमानं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2025 19:01 IST

1 / 7
रोपांची चांगली वाढ होण्यासाठी कुंडीतली माती वेळोवेळी बदलण्याची गरज असते. जर माती वर्षातून एकदा किंवा दोनदा बदलली नाही तर ती खूप चिकट आणि जड होते.
2 / 7
अशा चिकट आणि जड मातीमध्ये रोपांची चांगली वाढ होत नाही. कारण मुळांना व्यवस्थित ऑक्सिजन मिळत नाही.
3 / 7
चिकट झालेली माती पाणी जास्त धरून ठेवत असल्याने मुळं कुजून जातात. त्यामुळे मग पुरेसं खत टाकूनही ना रोपांची चांगली वाढ होते ना त्याला फुलं येतात.
4 / 7
कुंडीतली माती बदलणं हे तसं थोडं वेळखाऊ काम आहे. आता हे काम करण्यासाठी लगेचच वेळ काढणं तुम्हाला शक्य होत नसेल तर हा एक सोपा उपाय करून पाहू शकता.
5 / 7
हा उपाय करण्यासाठी ३०० मिलिमीटर पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये २ टेबलस्पून व्हाईट व्हिनेगर घाला.
6 / 7
याच मिश्रणात १ चमचा बेकिंग सोडा घाला आणि सगळं पाणी व्यवस्थित हलवून घ्या.
7 / 7
आठवड्यातून एकदा हे पाणी कुंडीतल्या मातीमध्ये घाला. यामुळे हळूहळू माती भुसभुशीत होईल आणि रोपंही छान वाढतील.
टॅग्स : बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सपाणीखतेफुलं