1 / 6बऱ्याचदा असं होतं की जास्वंदाच्या रोपावर पांढरा रोग पडतो. किंवा कळ्यांवर, फुलांवर मुंग्या आणि बारीक किडे दिसायला लागतात.(home made insecticides for jaswand plant)2 / 6या किडीमुळे कळ्या कुरतडल्या जातात आणि चांगली फुलं येत नाहीत. यावर एक खूप चांगला सोपा घरगुती उपाय करता येतो.(home hacks for the blooming of jaswand plants)3 / 6हा उपाय करण्यासाठी २ ते ३ हिरव्या मिरच्या आणि ७ ते ८ लसूण पाकळ्या घ्या.4 / 6हिरव्या मिरच्या आणि लसूण पाकळ्या खलबत्त्यामध्ये थोड्या कुटून घ्या आणि त्यामध्ये अर्धा चमचा डिशवॉश लिक्विड आणि थोडं पाणी घाला. हे मिश्रण एखादा दिवस झाकून ठेवा.5 / 6दुसऱ्यादिवशी ते गाळून घ्या आणि त्यामध्ये १ लीटर पाणी घाला. आता हे पाणी रोपांवर शिंपडा. तसेच थोडं पाणी कुंडीतल्या मातीतही घाला. 6 / 6आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करा. रोग निघून जाईल आणि त्यानंतर रोपाची चांगली वाढ होऊन भरपूर फुलंही येतील.