Join us

घरात पडून असलेल्या 'या' गोष्टी झाडांसाठी ठरतात वरदान, झाड वाढीसाठी स्वस्तात मस्त उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 11:33 IST

1 / 7
Gardening Tips : बऱ्याच लोकांना घराच्या अंगणात किंवा बाल्कनीमध्ये वेगवेगळी हिरवीगार झाडी लावण्याची आवड असते. शो ची झाडी किंवा फुलांची झाडी घरात आणली जातात आणि काही दिवस त्यांची काळजीही घेतली जाते. पण कालांतरानं झाडांची योग्य ती काळजी घेतली जात नाही. कधी कधी तर खर्चाचाही विचार केला जातो. तसं पहायला गेलं तर गार्डनिंग करण्यासाठी म्हणजे झाडांची काळजी घेण्यासाठी घरातील काही गोष्टींचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी वेगळा खर्च करण्याची अजिबात गरज पडत नाही. अशाच काही गोष्टींबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीनं तुम्ही घरातील झाडं आणखी चांगली वाढवू आणि फुलवू शकता.
2 / 7
बांधकामासाठी वापरली जाणारी वाळू मातीमध्ये मिक्स करून तुम्ही पॉटिंग मिक्स तयार करू शकता. हे मातीचं मिश्रण अतिरिक्त पाणी बाहेर काढतं आणि मुळांच्या योग्य वाढीसाठी मदत करतं.
3 / 7
हळदीमध्ये अॅंटी-फंगल गुण असतात आणि यानं नवीन रोपांच्या कटिंगमुळे फंगल इन्फेक्शन रोखण्यास मदत मिळते. कटिंग करतेवेळी हळद लावल्यानं रोपाची वाढही लवकर होते. त्यामुळेच कटिंग करताना हळद लावणं गरजेचं असतं.
4 / 7
लसणाचा स्प्रे झाडांमध्ये होणारं कोणतंही इन्फेक्शन किंवा कीटक दूर करण्यास मदत करतो. यासाठी लसणाच्या कळ्या सोलून त्या पाण्यात मिक्स करा. यात लिक्विड सोप टाकून रात्रभर तसंच ठेवा. नंतर हे मिश्रण गाळून झाडांवर स्प्रे करा. लसणाची साल फेकण्याऐवजी कुंड्यांमध्ये टाका. यानंही फायदा मिळेल.
5 / 7
झाडांची वाढ होण्यासाठी चहा पावडर खूप फायदेशीर ठरतं. चहा केल्यानंतर शिल्लक राहिलेलं चहा पावडर झाडाच्या मुळांमध्ये टाका. यानं झाडांना चांगलं पोषण मिळतं. याचा दुसरा वापर असा की एक चमचा चहा पावडर 1 लीटर पाण्यात मिक्स करा आणि रात्रभर तसंच ठेवा. हे पाणी सकाळी गाळून घ्या आणि झाडाला टाका.
6 / 7
कोरफडीमध्ये व्हिटामिन, अमीनो अॅसिड, स्टेरोल आणि ग्लोमॅनन असतं, जे झाडाची मूळं मजबूत करण्यास मदत करतात. कोरफडीचा गर झाडांमध्ये टाकाल तर अधिक फायदा मिळेल.
7 / 7
घरात रिकाम्या काचेच्या बॉटल तर अनेक पडून असतात. यांचा वापर तुम्ही पाण्यात उगवणाऱ्या रोपांसाठी करू शकता. म्हणजे तुम्हाला बाहेरून वेगळे पॉट किंवा बॉटल विकत आणण्याची गरज पडणार नाही.
टॅग्स : बागकाम टिप्ससोशल व्हायरल