1 / 8निसर्गाने तयार केलेल्या अनेक सुंदर गोष्टींपैकी एक म्हणजे फुल. अनेक प्रकारची सुंदर तशीच सुगंधी फुले असतात. ही फुले आपण देवाला वाहायला वापरतो तसेच केसात माळायला फुलांचा वापर केला जातो. 2 / 8सुवासिके तयार करण्यासाठी फुलांचा वापर केला जातो. साबण, शाम्पू सारखी अनेक ब्यूटी प्रॉडक्ट्स तयार करताना रंगासाठी तसेच वासासाठी विविध फुलांचा वापर केला जातो. मात्र ही फुले औषधीही असतात. त्वचेसाठी तसेच केसांसाठी त्यांचा अर्क फार पौष्टिक असतो. 3 / 8अशी काही फुले तुमच्या बागेतही असतील जी फक्त काही ठराविक कामांसाठी तुम्ही वापरत असाल. पाहा कोणती फुले आहेत ज्यांचा वापर तुम्ही औषध म्हणूनही करु शकता. 4 / 8बाप्पाला वाहायला आपण जास्वंदीचे फुल वापरतो. मात्र हे फुल फार औषधीही आहे. केसांसाठी जादू सारखे काम करणारे हे फुल अन्नातही वापरले जाते. त्याचा चहा करुन प्यायल्याने अनेक फायदे मिळतात. 5 / 8मोगरा हे फार लोकप्रिय फुल आहे. मोगऱ्याचा वास फार मनमोहक असतो. मोगऱ्याचे पाणी प्यायल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. मोगऱ्याच्या पाण्यामुळे पोटाला थंडावा मिळतो. 6 / 8गुलाबाच्या पाकळ्यांचे गुलकंद केले जाते. गुलकंद पचनासाठी आणि पोटासाठी फार गुणकारी आहे. गुलाबाचे सरबतही केले जाते. गुलाब जेवढे सुंदर आहे तेवढेच औषधीही आहे. 7 / 8आजकाल ब्लू टी हा प्रकार वजन कमी करण्यासाठी फार प्यायला जातो. हे ब्लू टी वेगळे काही नसून गोकर्णाच्या फुलांचा अर्क आहे. गोकर्ण वजन कमी करण्यासाठी तसेच ताण-तणाव कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. 8 / 8झेंडूचे फुल तर समारंभांत वापरले जातेच. झेंडूमध्ये अँण्टी सेप्टिक गुणधर्म असतात तसेच झेंडू अँण्टी इंफ्लेमेटरी असते. त्यामुळे त्याचा तेलात वापर केला जातो. तसेच आयुर्वेदिक लेपांमध्ये त्याचा वापर केला जातो.