महिन्यातून फक्त एकदा १ बटाटा घ्या, ‘हा’ उपाय करा! बागेतील प्रत्येक रोप फुलांनी डवरेल
Updated:July 5, 2025 15:05 IST2025-07-05T13:50:26+5:302025-07-05T15:05:28+5:30

वेगवेगळ्या रंगांची बहरलेली फुलं पाहिली की मन कसं फ्रेश होऊन जातं. आणि त्यात जर ती फुलं आपल्या अंगणात किंवा बाल्कनीमध्ये बहरलेली असतील तर त्या फुलांचा आनंद विचारायलाच नको..
त्यामुळे अनेक जण हौशीने वेगवेगळी फुलझाडं आपल्या अंगणात, बाल्कनीमधल्या कुंड्यांमध्ये लावतात. पण नेमकं होतं असं की त्या फुलझाडांना फुलंच येत नाहीत. आठवड्यातून कधीतरी एखादं फुल येतं आणि त्यावरच समाधान मानावं लागतं.
म्हणूनच आता हा एक सोपा उपाय पाहा.. हा उपाय केल्यामुळे तुमच्याकडची फुलझाडं नेहमीच फुलांनी बहरलेली दिसतील.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक बटाटा लागणार आहे. बटाट्याचे बारीक काप करा आणि मग ते मिक्सरमधून वाटून त्याची बारीक प्युरी करून घ्या.
बटाट्याची प्युरी जेवढी असेल त्याच्या पाचपट पाणी त्यात घाला आणि हे पाणी महिन्यातून एकदा किंवा दोनदाच तुमच्या बागेतल्या फुलझाडांना द्या.
हा उपाय केल्यामुळे रोपांना भरपूर प्रमाणात पोटॅशियम मिळतं आणि त्यामुळे रोपांना भरपूर फुलं येतात. एकदा प्रयोग करून पाहा.