Join us
Daily Top 2 Weekly Top 5

बागेत ना रोपांना वाढ ना फुलांचा बहर? सगळ्या तक्रांरींवर १ घरगुती उपाय-प्रत्येक रोपावर डोलतील फुलंच फुलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2026 15:44 IST

1 / 7
बऱ्याचदा असं होतं की आपण लावलेली रोपं नीट वाढत नाहीत. किंवा त्यांची पानं छान हिरवीगार न दिसता पिवळट पडलेली दिसतात.(best home hacks for the fast growth of plants)
2 / 7
कधी कधी रोपांवर रोग पडतो, कळ्यांना मुंग्या लागतात. हळूहळू ही किड वाढत जाते आणि मग नंतर रोप जळायला सुरुवात होते.
3 / 7
कधी कधी राेपं छान वाढतात, पण त्यांना फुलंच येत नाहीत (gardening tips for blooming flowering plants). अशी रोपांच्या संदर्भातली तुमची कोणतीही तक्रार असेल तर पुढे सांगितलेला एक सोपा घरगुती उपाय करा. हा उपाय करताच तुम्हाला तुमच्या रोपांमध्ये खूप छान बदल झालेला दिसेल.
4 / 7
हा उपाय alpha_vatika या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी एका बादलीमध्ये १० लीटर पाणी घ्या. या पाण्यामध्ये १ ते दिड ग्लास दूध घाला. रोपांची चांगली वाढ होण्यासाठी दुधामधले घटक खूप उपयुक्त ठरतात.
5 / 7
त्यामध्ये आता २ चमचे हळद घाला. हळदीमध्ये असणारे ॲण्टीफंंगल, ॲण्टी बॅक्टेरियल गुणधर्म रोपांवर कोणताही रोग पडू देत नाहीत. त्यामुळे रोपं निरोगी, हिरवीगार राहण्यास मदत होते.
6 / 7
यानंतर वाटीभर पाण्यामध्ये १ चमचा गूळ विरघळून घ्या आणि हे गुळाचं पाणी देखील त्या १० लीटर पाण्यामध्ये मिसळा. गुळामुळे मातीचा कस वाढण्यास मदत होते आणि रोपांची चांगली वाढ होते.(home made fertilizer for the fast growth of plants)
7 / 7
यानंतर १ वाटी गरम पाण्यात अर्धा चमचा हिंग विरघळून घ्या आणि ते पाणीही १० लीटर पाण्यात मिसळा. रोपांना कीड लागू नये म्हणून हिंग खूप फायदेशीर ठरतो. रोपांसाठी हिंग एखाद्या किटक नाशकाप्रमाणे काम करतो.
टॅग्स : बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सपाणीखतेहोम रेमेडीगच्चीतली बाग