Join us

एप्रिल- मे महिन्यात 'ही' रोपं घरी आणून लावा- वर्षभर रंगबेरंगी फुलांनी बहरून जातील कुंड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2025 14:30 IST

1 / 6
आपल्या बागेत किंवा बाल्कनीमधल्या कुंड्यांमध्ये नेहमीच वेगवेगळ्या रंगांची फुलं असावी, असं तुम्हाला वाटत असेल तर या काही फुलझाडांची खरेदी करण्यासाठी हाच एक उत्तम हंगाम आहे.(List of Permanent Flowering plants)
2 / 6
पहिलं रोप म्हणजे बोगन वेल. जर तुमच्याकडे थोड्या मोठ्या आकाराच्या कुंड्या ठेवण्याएवढी जागा असेल आणि भरपूर ऊन येत असेल तर बोगन वेल नक्की लावा. त्याला नेहमीच रंगबेरंगी फुलं येतात.(beautiful flowering plants for terrace garden)
3 / 6
दुसरं म्हणजे जास्वंद. जास्वंदाचेही कित्येक वेगवेगळे रंग तुम्हाला नर्सरीमध्ये अगदी सहज मिळतील.
4 / 6
इझोराची फुलंही नेहमीच येतात. केशरी, पिवळा, लाल, गुलाबी, जांभळा अशा वेगवेगळ्या रंगात इझोरा मिळतो आणि शिवाय त्याची खूप काळजी घेण्याचीही गरज नसते.
5 / 6
गोकर्णाच्या वेलीलाही बाराही महिने फुलं येतात. निळ्याशार रंगाची फुलं पाहूनच मन प्रसन्न होऊन जातं.
6 / 6
पाचवं रोप म्हणजे गुलाब. गुलाबाच्या रोपाची व्यवस्थित काळजी घेऊन त्याला वेळोवेळी खत घातलं तर गुलाबाच्या रोपालाही बाराही महिने फुलं येतात. वेगवेगळ्या आकाराच्या आणि वेगवेगळ्या रंगांच्या गुलाबाची कित्येक रोपं नर्सरीमध्ये किंवा ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळू शकतात.
टॅग्स : बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सफुलंखरेदीऑनलाइन