Join us

१५ दिवसांतच मोगऱ्याला येतील भरपूर कळ्या- 'हे' खत घाला, घरभर दरवळेल मोगऱ्याचा सुगंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2025 19:20 IST

1 / 5
उन्हाळ्याचे दिवस म्हणजे माेगऱ्याला बहर येण्याचे दिवस. पण अजूनही तुमच्या घरच्या मोगऱ्याला बहर आला नसेल तर हा एक सोपा उपाय लगेचच करून पाहा..
2 / 5
हा उपाय करण्यासाठी एक चमचाभर एप्सम सॉल्ट घ्या.
3 / 5
त्यामध्ये दोन वाट्या कंपोस्ट खत आणि केळीच्या दोन सालांचे तुकडे करून घाला.
4 / 5
हे तिन्ही पदार्थ व्यवस्थित मिक्स करा आणि मोगऱ्याच्या कुंडीमधल्या मातीमध्ये मिसळून टाका. या खताच्या वर पुन्हा थोडी माती घालून पाणी टाका.
5 / 5
मोगऱ्याच्या कुंडीतल्या मातीमध्ये एक- दोन खडू खोचून ठेवा. यामुळे रोपाला कॅल्शियम मिळून त्याची जास्त चांगली वाढ होेईल.
टॅग्स : बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सपाणी