1 / 6कडिपत्ता स्वयंपाकाला सुगंधित करण्यासोबतच अन्नपदार्थांची पौष्टिकताही भरपूर वाढवताे. त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात थोडा तरी कडिपत्ता असायलाच हवा, असं म्हणतात.2 / 6याशिवाय कडिपत्त्याचा केसांसाठी आणि त्वचेसाठीही खूप वेगवेगळ्या पद्धतींनी वापर करता येतो. त्यामुळे सौंदर्य खुलविण्यासाठीही कडिपत्ता उपयोगी येतो.3 / 6त्याच्या एवढ्या सगळ्या उपयोगांमुळे आपण तो हौशीने लावतो. पण त्याची वाढ होतच नाही. काड्या वाढत जातात आणि पानांचा मात्र पत्ताच नसतो. पानांचा आकारही लहान असतो. असं जर होत असेल तर कडिपत्त्याला पुढे सांगितलेली काही खतं घालून पाहा.4 / 6कडिपत्त्याच्या रोपासाठी ताक हे उत्तम खत आहे. त्यामुळे ताक आणि पाणी १: ३ याप्रमाणात मिसळून कडिपत्त्याच्या रोपाला द्या. आठवड्यातून एकदा हा प्रयोग करा. रोपाची चांगली वाढ होईल.5 / 6१ लीटर पाण्यात १ चमचा एप्सम सॉल्ट मिसळून ते पाणी कडिपत्त्याला द्या. १५ दिवसांतून एकदा हा उपाय करावा.6 / 6महिन्यातून एकदा कडिपत्त्याच्या रोपाला गांडूळ खत दिल्यास त्याचाही खूप चांगला परिणाम कडिपत्त्याच्या रोपावर दिसून येतो.