रोपांनाही खाऊ घाला थोडीशी साखर! भरपूर फुलं येण्यासोबतच होतील ३ जबरदस्त फायदे
Updated:July 4, 2025 16:54 IST2025-07-04T16:47:17+5:302025-07-04T16:54:29+5:30

साखरेचे गोड पदार्थ अनेकांच्या आवडीचे. पण हल्ली वाढत्या वजनामुळे आणि आजारांमुळे साखर खाणं अनेकजण टाळतात.
योग्य प्रमाणात साखर खाल्ली तर त्यामुळे अंगात उर्जा येते. थकवा घालविण्यासाठीही थोडीशी साखर खाण्याचा सल्ला दिला जातो. तसेच साखरेचे वेगवेगळे फेसपॅक चेहऱ्याला लावले तर त्वचाही खुलते. त्वचेवरही ग्लो येतो.
असंच काहीसं रोपांच्या बाबतीतही होतं. वेगवेगळ्या प्रकारे जर तुम्ही रोपांना थोडीशी साखर दिली तर त्यामुळे तुमची बाग हिरवीगार आणि नेहमीच फुललेली राहू शकते.
याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ gardening.tipss या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला असून यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की ग्लासभर पाण्यात अर्धा ग्लास दूध आणि चमचाभर साखर घालून ते पाणी रोपांना दिलं तर त्यामुळे रोपांची भराभर वाढ होते.
१ ग्लास पाण्यात एक ते दोन चमचे साखर घालून ते पाणी रोपांना दिल्यास रोपांची पानं नेहमीच हिरवीगार आणि टवटवीत राहतात.
साखर आणि व्हिनेगर हे मिश्रण रोपांना दिल्यास रोपांना नव्या फांद्या लवकर फुटतात आणि ते डेरेदार होण्यास मदत होते.
साखर आणि बिअर हे मिश्रण जर रोपांना दिलं तर ते फुलझाडांसाठी एक उत्तम खत ठरतं. त्यामुळे रोपांना भरपूर फुलं येतात.