Join us
Daily Top 2 Weekly Top 5

हिवाळ्यात तुळस लवकर सुकते, मलून दिसते? ५ उपाय- तुळस डेरेदार भरगच्च होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2025 18:18 IST

1 / 6
हिवाळा सुरू झाला की अनेक ठिकाणी तुळशीची पानं गळायला लागतात आणि तिच्या अगदी काड्या काड्याच दिसू लागतात. असं होऊ नये म्हणून पुढे सांगितलेल्या काही गोष्टी करून पाहा..
2 / 6
तुळशीला आलेल्या मंजिरी लगेचच काढून टाकाव्या. मंजिरी काढल्या नाहीत तर तुळशीची वाढ खुंटत जाते.
3 / 6
तुळशीच्या रोपाला खूप पाणी घालू नये. कुंडीतली माती कोरडी झाली आहे, असे दिसल्यासच पाणी घालावे. पाणी जास्त झाल्यास मुळं सडून तुळस खराब होऊ लागते.
4 / 6
हिवाळ्यात कुंडीतल्या मातीवर वर्तमान पत्राचा पेपर, वाळलेली पानं असं काही टाकून ठेवा. यामुळे माती जास्त थंड पडणार नाही.
5 / 6
रात्रीच्यावेळी तुळशीवर एखादा प्लास्टिकचा जाड कपडा किंवा सुती कपडा टाकून ठेवा. यामुळे तिला थेाडं उबदार वाटेल.
6 / 6
तुळशीचं रोप अशा ठिकाणी ठेवा जिथे तिला ४ ते ५ तास कडक ऊन मिळेल. या गोष्टींची काळजी घेतल्यास तुळस सुकणार नाही.
टॅग्स : बागकाम टिप्सपाणीथंडीत त्वचेची काळजीइनडोअर प्लाण्ट्स