मनी प्लांट सुकून जाऊ नये म्हणून मातीत मिसळा ५ पदार्थ, वाढेल हिरवागार भरभर...

Updated:July 3, 2025 10:05 IST2025-07-03T09:58:00+5:302025-07-03T10:05:01+5:30

5 Things Use Useful To Increase Money Plant Growth Faster : Secret to Grow Money Plants Amazingly Faster and Bushier : Important Tips To Get That Money Plant Bushy & Glow : Money Plants Care Guide : Money Plant Care Tips : How To Grow Plants Faster and Bigger At Home : पावसाळ्यात अनेकदा मनी प्लांट खराब होते, असे होऊ नये म्हणून खास घरगुती उपाय...

मनी प्लांट सुकून जाऊ नये म्हणून मातीत मिसळा ५ पदार्थ, वाढेल हिरवागार भरभर...

बऱ्याचजणांच्या घरात किमान एक तरी छोटंसं मनी प्लांटच रोप (How To Grow Plants Faster and Bigger At Home) असतंच. मनी प्लांट छान वेगाने वाढून त्याचा वेल पसरला असेल आणि हिरवागार बहर आला असेल तरच मनी प्लांट शोभून दिसते. मनी प्लांटचे रोप अतिशय नाजूक असल्याने त्याची विशेष काळजी घ्यावी लागते. मनी प्लांट जवळपास प्रत्येक घरात असला तरी प्रत्येकाच्या तक्रारी या वेगवेगळ्या असतात. कधी मनी प्लांटची वाढ खुंटते, पाने पिवळी पडतात, सुकून जातात अशा एक ना अनेक तक्रारी असतात.

मनी प्लांट सुकून जाऊ नये म्हणून मातीत मिसळा ५ पदार्थ, वाढेल हिरवागार भरभर...

मनी प्लांटची वाढ चांगली व्हावी, पाने छान हिरवीगार व्हावीत (5 Things Use Useful To Increase Money Plant Growth Faster) यासाठी आपण बाजारांत विकत मिळणारी अनेक औषध, खते घालतो. परंतु बाजारांत विकत मिळणाऱ्या खतांपेक्षा स्वयंपाकघरात असणारे काही साधे-सोपे पदार्थ मनी प्लांटच्या वाढीसाठी अधिक उत्तम ठरतात. नैसर्गिक आणि सेंद्रिय उपाय मनी प्लांटचं पोषण करून त्याची वाढ वेगाने आणि निरोगी करतात.

मनी प्लांट सुकून जाऊ नये म्हणून मातीत मिसळा ५ पदार्थ, वाढेल हिरवागार भरभर...

यासाठीच, स्वयंपाकघरातील ५ पदार्थ असे आहेत जे मनी प्लांटच्या ( Secret to Grow Money Plants Amazingly Faster and Bushier) वाढीसाठी फायदेशीर ठरू शकतात, हे पदार्थ नेमके कोणते आहेत ते पाहूयात.

मनी प्लांट सुकून जाऊ नये म्हणून मातीत मिसळा ५ पदार्थ, वाढेल हिरवागार भरभर...

मनी प्लांट भराभर वाढावी तसेच छान बहरुन हिरवीगार व्हावी यासाठी, काही घरगुती पदार्थांच्या मदतीने घरीच नैसर्गिक खत तयार करता येते. हे खत तयार करण्यासाठी सर्वातआधी, वापरलेली चहा पावडर आणि बटाट्याची सालं, मोहरीचे दाणे व्यवस्थित उन्हांत वाळवून त्याची पावडर करुन घ्यावी. त्यानंतर एका मोठ्या बाऊलमध्ये, बारीक किसलेला गूळ घेऊन त्यात हळद व वाळवून घेतलेल्या पदार्थांची पावडर एकत्रित करुन घालावी. मनी प्लांटसाठी घरगुती पदार्थांच्या मदतीने तयार केलेलं नैसर्गिक खत वापरण्यासाठी तयार आहे. दर १५ ते २० दिवसांनी या मिश्रणाचा एक छोटा चमचा मनी प्लांटच्या कुंडीतल्या मातीमध्ये घाला आणि थोडं पाणी शिंपडा.

मनी प्लांट सुकून जाऊ नये म्हणून मातीत मिसळा ५ पदार्थ, वाढेल हिरवागार भरभर...

गुळ मातीमध्ये सूक्ष्म आणि चांगले जिवाणू वाढवतो, ज्यामुळे माती अधिक सुपीक होते यामुळे मनी प्लांटला आवश्यक पोषकद्रव्ये सहज शोषून घेता येतात.

मनी प्लांट सुकून जाऊ नये म्हणून मातीत मिसळा ५ पदार्थ, वाढेल हिरवागार भरभर...

वापरलेली चहा पावडर मनी प्लांटची पाने गडद हिरवी आणि आकाराने मोठी करण्यास फायदेशीर ठरतात. यात नायट्रोजन असते, जे पानांच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त ठरते.

मनी प्लांट सुकून जाऊ नये म्हणून मातीत मिसळा ५ पदार्थ, वाढेल हिरवागार भरभर...

मोहरीमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे तिन्ही घटक असतात. यामुळे मनी प्लांटच्या पानांची चांगली वाढ, मुळांना मजबुती आणि पानांना निरोगी ठेवण्यास मदत होते. यामुळे मातीही अधिक सुपीक आणि चांगली होते.

मनी प्लांट सुकून जाऊ नये म्हणून मातीत मिसळा ५ पदार्थ, वाढेल हिरवागार भरभर...

हळद ही नैसर्गिक औषधासारखी काम करते. हळद मनी प्लांटला रोग आणि कीड लागू देत नाही. विशेषतः मुळं सडण्यापासून संरक्षण करते. यामुळे मातीही स्वच्छ आणि निरोगी राहते.

मनी प्लांट सुकून जाऊ नये म्हणून मातीत मिसळा ५ पदार्थ, वाढेल हिरवागार भरभर...

बटाट्याच्या सालींमधे पोटॅशियम असतं, जे मनी प्लांटच्या पानांना चमकदार आणि निरोगी करत. बटाट्याच्या सालींमधील पोषक घटक मनी प्लांटची ताकद वाढवतं आणि रोपाला रोगांशी लढण्यास मदत करतं.