1 / 8आपल्या घराभोवती कुंड्यांमध्ये ठेवलेली लहान झाडं असतील, तरी त्यांना पाहून मन प्रसन्न होऊन जातं. दिवसभराची मरगळ, थकवा असं सगळं आपण विसरून जातो. 2 / 8स्वयंपाक करतानाही आपण तसंच आनंदी, उत्साही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉझिटीव्ह असणं गरजेचं असतं. कारण सगळ्या घराचं आरोग्य आपल्या स्वयंपाकातूनच तर जपलं जातं.3 / 8म्हणूनच स्वयंपाक घरात ही काही रोपं ठेवा. या रोपांना लकी प्लांट्स किंवा पॉझिटीव्ह एनर्जी देऊन मन फ्रेश करणारी रोपं म्हणून ओळखलं जातं. ती नेमकी कोणती ते पाहूया...4 / 8सगळ्यात पहिलं आहे ते झेड प्लांट. घरात पॉझिटीव्ह वाईब्ज तयार करणारं झाड म्हणून झेट प्लांट ओळखलं जातं.5 / 8बांबू प्लांट देखील हल्ली अनेकांच्या हॉलमध्ये किचनमध्ये दिसतं. हे छोटंसं झाड तुमच्या स्वयंपाक घराच्या खिडकीजवळ ठेवा. त्याच्याकडे नुसतं पाहूनही छान वाटेल.6 / 8मनी प्लांट हे अनेकांच्या आवडीचं. अगदी ऊन- सावली कुठेही वाढणारं हे झाड तुमच्या स्वयंपाक घरात ठेवलं तर स्वयंपाक घराची शोभा नक्कीच वाढवेल.7 / 8स्नेक प्लांटदेखील सर्वोत्तम इनडोअर प्लांट्सपैकी एक मानलं जातं. हे रोपं अधिकाधिक प्रमाणात ऑक्सिजन सोडतं, तसेच आजुबाजुचे दुषित वायू, दुर्गंध शोषून घेण्यात मदत करतं.8 / 8पाचवं रोप आहे स्पायडर प्लान्ट. कोणतीही विशेष काळजी न घेता हे रोप भराभर वाढत जातं. थोडंसं ऊन आणि थोडंसं पाणी मिळालं तरी हे रोपटं भरभरून वाढतं. ते ज्या पद्धतीने छान फुलून येतं, ते पाहूनच एकदम उत्साही, आनंदी वाटतं.