1 / 5आपल्या रोजच्या जेवणात आपण नियमितपणे हळद घालतो. हळदीमध्ये ॲण्टीबॅक्टेरियल, ॲण्टीफंगल घटक असल्याने ती आरोग्यदायीही असते. तब्येतीसाठी हळद जशी आरोग्यदायी असते, तशीच ती रोपांसाठीही खूप गुणकारी ठरते. 2 / 5रोज १ चमचा हळद नियमितपणे रोपांना घातल्यास रोपांमध्ये खूप चांगला परिणाम दिसून येतो. 3 / 5हळदीमध्ये गुणकारी घटक असल्याने जमिनीचा कस वाढण्यास मदत होते. त्यामुळे १५ दिवसांतून एकदा रोपांच्या कुंडीमध्ये एखादा चमचा हळद घालावी. 4 / 5महिन्यातून एकदा कुंडीमधल्या मातीमध्ये हळद मिसळल्यास रोप चांगलं रुजायला मदत होते आणि त्यामुळे रोपांची चांगली वाढ होते. 5 / 5बऱ्याचदा रोपांवर रोग पडतो. अशावेळी रोपांवर हळद मिसळलेलं पाणी शिंपडल्यास रोग निघून जाण्यास मदत होते. हळदीसोबतच त्यात थोडा बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस घालावा.