Join us
Daily Top 2 Weekly Top 5

उन्हामुळे गुलाबाचं रोप सुकू लागलं, २ सोपे घरगुती उपाय- गुलाब पुन्हा बहरेल, फुलंही येतील भरपूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2026 16:23 IST

1 / 6
उन्हामुळे गुलाबाचं रोप सुकू लागलं असेल, पानं कोमेजायला लागली असतील तर पुढे सांगितलेले काही उपाय नक्कीच करून पाहा...
2 / 6
सध्या वातावरणातली उष्णता एवढी वाढली आहे की आपल्या टेरेसमधल्या रोपांनाही ती सहन होत नाहीये. कित्येक रोपं उन्हामुळे सुकून चालली आहेत. फुलांचा आकारही लहान लहान होत चालला आहे.
3 / 6
अशातच उष्णतेमुळे गुलाबाचं रोपही सुकून चाललं असेल तर त्याला थोडा गारवा देण्यासाठी पुढे सांगितलेला एक उपाय करून पाहा... त्यासाठी आपल्याला कोरफड वापरायची आहे.
4 / 6
कोरफड रोपांसाठी नॅचरल कुलिंग एजंट म्हणून काम करते. यासाठी कोरफडीचा २ ते ३ चमचे गर घ्या. तो दोन लीटर पाण्यात १० ते १२ तास ठेवा. यानंतर हे पाणी गाळून गुलाबाला घाला.
5 / 6
दुसरा उपाय म्हणजे केळीचं सालं २४ तास पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर ते पाणी गाळून घ्या आणि गुलाबाला द्या. यामुळेही गुलाब हिरवागार होण्यास मदत होईल आणि फुलंही जास्त येतील.
6 / 6
उन्हाळ्यात अगदी सगळी किंवा संध्याकाळी सुर्यास्त होण्याच्या आधी रोपांना पाणी द्यावे. दुपारी पाणी देऊ नये.
टॅग्स : बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सपाणीखतेफुलंहोम रेमेडी