World Vada Pav Day 2025 : मुंबईतले फेमस वडापाव, सांगा तुमचा फेवरिट वडापाव कोणता?
Updated:August 23, 2025 14:45 IST2025-08-23T14:14:38+5:302025-08-23T14:45:08+5:30
World Vada Pav Day 2025 : Mumbai street food vada pav : Famous Vada Pav In Mumbai :मुंबईत मिळणारे अफलातून चवीचे लोकप्रिय वडापाव...

'वडापाव' हा जगप्रसिद्ध असा एकमेव स्ट्रीटफूडचा पदार्थ आहे. प्रत्येक भारतीयाची (World Vada Pav Day 2025) पहिली पसंत म्हणजेच मस्त गरमागरम वडापाव. वडापाव आपण कधीही, कुठेही आणि कितीही खाऊ शकतो. मुंबईत राहणाऱ्या गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सगळ्यांचेच पोट भरणारा हा वडापाव. पांढऱ्याशुभ्र पावाला हिरवी - लाल सुकी चटणी लावून मग त्यात गरमागरम वडा ठेवून सोबत तोंडी लावायला तळलेली मिरची असा झक्कास वडापाव म्हणजे सुखचं..
मुंबईत तर अगदी रस्त्यांवरच्या ठेल्यापासून ते मोठमोठाल्या दुकानांमध्येही (Famous Vada Pav In Mumbai) वडापाव विकला जातो. गरमागरम वडापाव म्हणजे मुंबईतील प्रत्येकाचा अगदी जीव की प्राण... मुंबईतील बऱ्याचशा लोकांचा सकाळचा नाश्ता ते रात्रीचे जेवण हा वडापावच असते. मुंबईच्या कानाकोपऱ्यात असे काही फेमस आणि वेगळ्या चवींचे वडापाव फार मोठ्या प्रमाणावर विकले जातात, यातीलच काही लोकप्रिय, भन्नाट चवींचे वडापाव कोणते ते पाहूयात..
१. आनंद वडापाव (विलेपार्ले) :-
मुंबईतील विलेपार्लेच्या पश्चिम भागात स्टेशन जवळ मिळणारा हा आनंद वडापाव प्रचंड लोकप्रिय आहे.
२. ग्रॅज्युएट वडापाव (भायखळा) :-
भायखळा रेल्वे स्थानच्या पूर्वेकडील भागात हा ग्रॅज्युएट वडापाव मिळतो. हा वडापाव मुंबईतील बेस्ट वडापाव पैकी एक आहे.
३. बोरकर वडापाव (गिरगाव) :-
गिरगावातील बोरकर वडापाव हा देखील मुंबईतील सगळ्यात लोकप्रिय वडापाव पैकी एक आहे. या वडापाव सोबत दिली जाणारी चटणी हीच खवय्यांसाठी मेजवानी असते. या वडापाव सोबत दिल्या जाणाऱ्या चविष्ट चटणीची चव कायम जिभेवर रेंगाळत राहते.
४. भाऊ वडापाव (भांडुप) :-
भांडुपमधील वाल्मिकी नगर या परिसरात भाऊ वडापाव विकत मिळतो.
५. लक्ष्मण वडापाव (घाटकोपर) :-
घाटकोपर पूर्व भागात मिळणारा लक्ष्मण वडापाव हा अतिशय फेमस वडापाव पैकी एक आहे. यांच्याकडे मिळणारा जैन वडापाव ही त्यांची मुख्य खासियत आहे.
६. गजानन वडापाव (ठाणे) :-
ठाण्यातील सगळ्यात सुप्रसिद्ध असलेला वडापाव म्हणजे गजानन वडापाव. या वडापाव सोबत दिल्या जाणाऱ्या चटणीच्या चवीमुळेच हा वडापाव इतका लोकप्रिय आहे. हा वडापाव खाण्यासाठी ठाणे स्टेशन बाहेर खवय्यांची चांगलीच गर्दी असते.
७. अशोक वडापाव (प्रभादेवी) :-
प्रभादेवी मधील कीर्ती कॉलेजच्या बाहेर मिळणारा अशोक वडापाव हा मुंबईतील फेमस वडापाव पैकी एक आहे. अनेक सेलिब्रिटीजनीं देखील या वडापावची चव चाखली आहे.
८. आराम वडापाव (सीएसटी) :-
७० वर्षांचा वारसा असलेल्या या स्टॉलमध्ये तळलेल्या मिरच्या आणि कांद्यासोबत गरमागरम वडापाव खायला दिला जातो जो अप्रतिम लागतो. सीएसटी स्टेशनसमोर हा आराम वडापाव मुंबईतील फेमस वडापावपैकी एक आहे.
९. श्री कृष्ण बटाटावडा (दादर) :-
दादर पश्चिम येथील श्री कृष्ण बटाटावडा हे एक प्रसिद्ध ठिकाण. १९७० पासून दादरमधील उत्तम चवीच्या वडापावसाठी अतिशय लोकप्रिय असलेले हे खास ठिकाण ओळखले जाते. यांच्याकडे विशेषसा करून बटाटा वडा, कोथिंबीर वडी, समोसा आणि चाट अशा पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे आणि तेथे पारंपरिक मराठी खाद्यपदार्थ देखील मिळतात.
१०. कुंजविहार वडापाव (ठाणे) :-
ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला मिळणारा वडापाव म्हणजे कुंजविहारचा वडापाव. हा वडापाव मुंबईमधील प्रसिद्ध वडापाव पैकी एक आहे.