गुलाबी थंडीत सायंकाळच्या जेवणासाठी करा सूपचे ८ प्रकार, प्या सूप-तब्येतही एकदम ठणठणीत
Updated:December 13, 2023 16:27 IST2023-12-13T16:12:24+5:302023-12-13T16:27:19+5:30
Winter Special Soup Recipe

टोमॅटो सूप किंवा सार नेहमीचेच असून ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे आणि करायलाही सोपे असते (Winter Special Soup Recipe).
आमसूल आरोग्यासाठी फायदेशीर असून त्याचे सार अतिशय झटपट होणारे आणि तोंडाला चव आणणारे असते.
हुलगे हे कोकणात पिकणारे एक कडधान्य असून त्याच्या पीठाचे म्हणजे कुळथाचे कढण थंडीत ताकद वाढण्यासाठी, रक्त वाढण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते
हिरव्या मूगाचे फायदे आपण नेहमीच ऐकतो, त्याच मुगाचे कढण किंवा सूप करून लहान मुले, वयस्कर व्यक्ती यांना दिल्यास थंडीत ऊर्जा मिळण्यासाठी याचा चांगला फायदा होतो.
पालक हा तर कॅल्शियम, लोह, जीवनसत्वे यांचा उत्तम स्रोत असून पालक सूप हा थंडीसाठी एक चांगला पर्याय होऊ शकतो
हिवाळ्यात भाज्या मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने फ्लॉवर, कोबी, मटार, घेवडा अशा घरात उपलब्ध असतील त्या सगळ्या भाज्यांचा वापर करून सूप केल्यास ते उत्तम होते.
थंडीच्या काळात मक्याचे कणीस चांगले मिळते. या मक्याचे दाणे आणि भाज्या यांपासून मस्त हॉटेल सारखे सूप तयार होऊ शकते
बीट, गाजर यांसारख्या भाज्या थंडीत चांगल्या प्रतीच्या मिळतात. अशावेळी बीट, गाजर, लाल भोपळा आणि टोमॅटो यांचे सूप केल्यास ते भरपूर जीवनसत्व देणारे आणि आरोग्यदायी ठरते