भलेही भरपूर पोषण देतात, टेस्टी लागतात पण काही लोकांसाठी वांगी घातक; पाहा कुणी आणि का खाऊ नयेत वांगी

Updated:March 5, 2026 17:23 IST2026-03-05T10:27:35+5:302026-03-05T17:23:16+5:30

Brinjal Side Effects: वांग्यातून शरीराला अनेक पोषक तत्वही मिळतात. पण काही लोकांनी वांगी चुकूनही खाऊ नयेत. कारण वांगी खाऊन त्यांच्या तब्येतीत आणखी बिघाड होऊ शकतो. अशात जाणून घेऊया की, वांगी कोणत्या लोकांनी खाऊ नये.

भलेही भरपूर पोषण देतात, टेस्टी लागतात पण काही लोकांसाठी वांगी घातक; पाहा कुणी आणि का खाऊ नयेत वांगी

Brinjal Side Effects: वांग्याची भाजी म्हणजे अनेकांसाठी जीव की प्राण असते. वांगी - बटाटे किंवा भरलेली वांगी लोक किंवा वांग्याचं भरीत कितीतरी लोक नेहमीच आवडीने खातात. ही अशी भाजी आहे जी जवळपास सगळ्याच घरांमध्ये आठवड्यातून कमीत कमी तीन ते चार वेळा खाल्ली जाते. वांग्यांपासून वेगवेगळे पदार्थही बनवले जातात. यातून शरीराला अनेक पोषक तत्वही मिळतात. पण काही लोकांनी वांगी चुकूनही खाऊ नयेत. कारण वांगी खाऊन त्यांच्या तब्येतीत आणखी बिघाड होऊ शकतो. अशात जाणून घेऊया की, वांगी कोणत्या लोकांनी खाऊ नये.

भलेही भरपूर पोषण देतात, टेस्टी लागतात पण काही लोकांसाठी वांगी घातक; पाहा कुणी आणि का खाऊ नयेत वांगी

बऱ्याच लोकांना अॅलर्जीची समस्या असते. अशांनी वांगी खाताना काळजी घेतली पाहिजे. कारण काही लोकांना वांगी खाल्ल्यानंतर त्वचेवर खाज, लाल चट्टे किंवा छोटे छोटे डाग येऊ शकतात. कधी कधी श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. जर अशी काही लक्षणं दिसली तर लगेच वांगी खाणं बंद करा. लहान मुले आणि महिलांमध्ये अॅलर्जी जास्त बघायला मिळते. अशात वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

भलेही भरपूर पोषण देतात, टेस्टी लागतात पण काही लोकांसाठी वांगी घातक; पाहा कुणी आणि का खाऊ नयेत वांगी

बऱ्याच लोकांचं पचन तंत्र नेहमीच बिघडलेलं असतं. पोटदुखी, जुलाब, बद्धकोष्ठता, अपचन अशा समस्या त्यांना नेहमीच होत असतात. जर या समस्या होत असतील तर त्यांच्यासाठी वांगी चांगली नाहीत. वांग्यांमध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असतं. जे पचनास मदत करतं. पण काही लोकांना यामुळे पोट फुगणे, गॅस किंवा पोटात वेदना यांसारख्या समस्या होऊ शकतात. जर आधीच पचनासंबंधी समस्या असेल तर आणि आपण वांगी जास्त खात असाल तर त्रास होऊ शकतो. अशात कमी प्रमाणातच वांगी खावीत.

भलेही भरपूर पोषण देतात, टेस्टी लागतात पण काही लोकांसाठी वांगी घातक; पाहा कुणी आणि का खाऊ नयेत वांगी

डॉक्टर अनेकदा सल्ला देतात की, किडनी स्टोन असेल तर वांगी खाणं टाळलं पाहिजे. कारण वांग्यांमध्ये ऑक्सालेटचं प्रमाण अधिक असतं. याच ऑक्सालेटने किडनीमध्ये स्टोन बनण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे ज्यांना आधीच किडनी स्टोनची समस्या असेल, तर त्यांनी वांगी जास्त खाऊ नये किंवा खाऊच नये.

भलेही भरपूर पोषण देतात, टेस्टी लागतात पण काही लोकांसाठी वांगी घातक; पाहा कुणी आणि का खाऊ नयेत वांगी

ज्या लोकांना सांधेदुखी किंवा आर्थरायटिसची समस्या आहे, त्यांच्यासाठी सुद्धा वांगी कधी कधी त्रासाचं कारण ठरू शकतात. काही लोकांमध्ये वांगी खाल्ल्यानंतर सांधेदुखी वाढू शकते. त्यामुळे सांधेदुखी असलेल्या लोकांनी नेहमी वांगी खाणं टाळलं पाहिजे. पण प्रत्येक व्यक्तीचं शरीर एकसारखं नसतं. त्यामुळे सगळ्यांवर एकसारखं प्रभाव पडत नाही.

भलेही भरपूर पोषण देतात, टेस्टी लागतात पण काही लोकांसाठी वांगी घातक; पाहा कुणी आणि का खाऊ नयेत वांगी

वांग्यामध्ये भरपूर पोषक तत्व असतात. पण तब्येतीसंबंधी काही समस्या असणाऱ्या लोकांनी वांगी खाताना काळजी घेतली पाहिजे. जर वांगी खाल्ल्यानंतर काही त्रास होत असेल किंवा वेगळं जाणवत असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा.