Join us

डोशाचं पीठ उरलं तर करा झटपट ५ पदार्थ, एकाच पीठात चमचमीत पदार्थ-नाश्ता गरमागरम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2025 18:52 IST

1 / 7
अण्णाकडे मिळणारा डोशाची चव आपल्यापैकी अनेकांच्या जीभेवर कायम टिकून राहाते. त्यामुळे आपण घरी डोसा बनवण्याचे ट्राय करतो. पण अनेकदा बॅटर इतके उरते की, फेकून देण्याची इच्छा होत नाही. त्यासाठी पुन्हा डोसा बनवून खाल्ला जातो. पण एकाच प्रकारचा डोसा खाऊन कंटाळा येतो. (leftover dosa batter recipes)
2 / 7
पण या उरलेल्या डोसा बॅटरपासून आपण ५ वेगवेगळे, झटपट आणि स्वादिष्ट पदार्थ बनवू शकता. ज्यामुळे सकाळचा नाश्ता हेल्दी देखील होईल आणि टेस्टी देखील लागेल. (quick breakfast ideas)
3 / 7
या बॅटरपासून आपण उत्तप्पा बनवू शकतो. यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि मीठ घालून बॅटर तयार करा. तवा गरम झाल्यावर बॅटर पसरवा. दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्या, तयार होईल चविष्ट उत्तप्पा. आपण यात हव्या त्या भाज्या देखील किसून घालू शकतो.
4 / 7
पातळ बॅटर तव्यावर पसरवून डोसा एका बाजून व्यवस्थित भाजा. त्यावर हिरवी चटणी, मेयोनिज किंवा सॉस लावा. त्यावर काकडी, टोमॅटो, कांदा कापून घाला. रोल बनवून सॅण्डविचसारखे खा. हा एक हेल्दी ब्रेकफास्ट होईल.
5 / 7
डोसा बॅटरमध्ये किसलेले गाजर, झुकिनी किंवा हिरव्या पालेभाज्या घालू शकतो. त्यात हळद, मीठ, लाल तिखट घालून त्याचा पॅनकेक किंवा चिल्ला बनवता येईल.
6 / 7
या बॅटरला थोडं घट्ट करण्यासाठी त्यात रवा, आले-हिरवी मिरची घालून अप्पे पात्रात आपण त्याचे आप्पे बनवू शकतो. हिरवी चटणी किंवा सॉससोबत खाता येईल.
7 / 7
डोसा पिझ्झा बनवण्यासाठी आपल्याला पिझ्झा सॉस, चीज आणि भाज्या लागतील. बॅटर जाडसर तव्यावर पसरवून घ्या. वरुन चीज, सॉस पसरवा. भाज्या घालून झाकूण मंद आचेवर शिजू द्या. हा मुलांसाठी हेल्दी ब्रेकफास्ट होईल.
टॅग्स : अन्नपाककृती