खूप आंबट झालेलं दही खाल्लं जात नाही? ४ चवदार पदार्थ करून खा- घ्या सोप्या रेसिपी
Updated:March 18, 2025 12:23 IST2025-03-18T12:13:52+5:302025-03-18T12:23:59+5:30

उन्हाळ्याच्या दिवसात दही खूप आंबट होतं. असं हे आंबट झालेलं दही अजिबात खाल्लं जात नाही. त्यामुळे असं दही काही जणी टाकून देतात. पण आंबट दही अशा पद्धतीने वाया घालविण्यापेक्षा त्यापासून तुम्ही वेगवेगळे चवदार पदार्थ करून त्याचा आस्वाद घेऊ शकता.(what to do if curd is very sour?)
आंबट झालेल्या दह्यापासून कोणते पदार्थ तयार करायचे आणि त्याची रेसिपी नेमकी कशी ते आता पाहूया..(simple and easy recipe from khatta dahi)
आंबट झालेलं दही चांगलं फेटून घ्या आणि त्याच्यात थोडं डाळीचं पीठ घालून त्याची कढी करा. खिचडीसोबत गरमागरम कढी करा, जेवणाची रंगत वाढेल.
आंबट झालेल्या दह्यापासून ताकातल्या मिरच्या किंवा आंबट मिरच्याही करता येतात. यासाठी दही पातळ करून त्याचं अगदी ताक करा.. मिरच्यांना उभा छेद द्या आणि त्यानंतर या मिरच्या ताकात टाका. मिरच्या पूर्णपणे भिजतील एवढं ताक असावं. त्यामध्ये मीठ आणि हळद घालून हे ताक गॅसवर उकळायला ठेवा. भांड्यातलं ताक आटून गेलं आणि मिरच्या व्यवस्थित शिजल्या की गॅस बंद करा. या ताकातल्या मिरच्या जेवणात तोंडी लावायला खूप छान लागतात.
ज्वारीचे पीठ, बेसन पीठ आणि गव्हाचे पीठ समप्रमाणात घेऊन एकत्र करा. त्यामध्ये आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबिरीची पेस्ट करून घाला आणि हे पीठ ताकामध्ये मळून घ्या. या पिठाच्या पुऱ्या अतिशय खमंग होतात
पुऱ्या तेलकट होतात म्हणून करायच्या नसतील तर वरील पद्धतीने पीठ मळून तुम्ही त्याचे धपाटेही किंवा पराठेसुद्धा करू शकता. ताकातले धपाटे हा मराठवाड्याचा एक खास पदार्थ आहे.
आंबट झालेल्या दह्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी टाका आणि हे पातळ ताक तुमच्या बागेतल्या रोपांना थोडं थोडं करून टाका. झाडांसाठी हे खूप छान पौष्टिक खत आहे.